पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अली करणार भारतीय मुलीशी लग्न ; २० ऑगस्टला अडकणार विवाहबंधनात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शोएब मलिक नंतर आता आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीय मुलीसोबत विवाह करणार असून २० ऑगस्टला दोघेही विवाहबंधनात अडकतील. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली भारतीय मुलगी शामिया यांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडणार आहे. हसन अली पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहे तर शामिया हि भारतातील हरियाणाची आहे.

शामियाचा परिवार फाळणीनंतर परिवार भारतात आला असून त्याआधी शामियाचे वडील लियाकत यांचे पाकिस्तानचे माजी खासदार सरदार तुफैले यांच्याशी घनिष्ट संबंध होते. हसन अलीचे वडील हे खासदार तुफैले यांचे सख्खे भाऊ आहेत. यावरून त्यांचे जुने पारिवारिक संबंध असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शामिया आणि हसन अली यांची ओळख झाली आणि कालांतराने त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

शामिया मागील तीन वर्षांपासून ती एअर अमीरातमध्ये काम करत असून शामियाने मानव रचना युनिव्हर्सिटीतून एरॉनॉटिकल इंजिनियरिंग केलेले आहे. तर शौकत अलीने २०१३ मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि २०१६ मध्ये पाकिस्तानी एकदिवसीय संघात पदार्पण केलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ५० बळी घेतलेले आहे.

शामियाचे वडील, लियाकत अली यांना याविषयी विचारले असता फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले असून मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा याचा काही फरक पडत नाही असे सांगितले. १७ ऑगस्टला शामियाचा परिवार लग्नासाठी दुबईला रवाना होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like