IND vs END 4th T20 : टीम इंडियाच्या विजयाची 5 मोठी कारणे, 2 चेंडूत बदलली पूर्ण मॅच

अहमदाबाद : भारताने इंग्लंडविरूद्ध अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेली चौथी टी20 मॅच 8 धावांनी जिंकून सीरीज 2-2 च्या बरोबरीत आणली. आता सीरीजचा निर्णय शनिवारी होणार्‍या शेवटच्या सामन्यात होईल. भारताने टॉस गमावल्यानंतर पहिली फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 185 धावा केल्या. तर इंग्लंडची टीम ठरलेल्या ओव्हरमध्ये 8 विकेटसह 177 धावाच बनवू शकली. भारताच्या विजयात अनेक खेळाडूंचे महत्वाचे योगदान होते. या पाच करणांमुळे भारत सीरीजमध्ये बरोबरी करू शकला…

1 – सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरची खेळी –
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 57 धावा बनवल्या आणि अंतरराष्ट्रीय टी20 च्या आपल्या पहिल्या डावात फिफ्टी करणारा तो पाचवा भारतीय खेळाडू बनला. श्रेयस अय्यरने सुद्धा अवघ्या 18 चेंडूत 205 च्या स्ट्राइक रेटने 37 धावा केल्या.

2 – हार्दिक पंड्याची फायदेशीर गोलंदाजी –
हार्दिक पंड्याने आपल्या 4 ओव्हरमध्ये 4 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 16 धावा दिल्या. त्याने जेसन रॉय आणि सॅम कर्रन यांची विकेट घेतली.

3 – राहुल चहरचे बेयरस्टोला आऊट करणे –
जॉनी बेयरस्टो आणि बेन स्टोक्स या धोकादायक ठरू लागलेली जोडी भारतीय लेग स्पिनर राहुल चहरने बेयरस्टोची विकेट घेऊन फोडली. बेयरस्टो 25 धावा बनवून आऊट झाला. चहरने डेव्हिड मलान (14धावा) ला सुद्धा आऊट केले.

4 – शार्दुल ठाकुरच्या लागोपाठ दोन विकेट –
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने मॅचमध्ये लागोपाठ दोन दोन चेंडूत बेन स्टोक्स (46 धावा) आणि इंग्लंडचा कर्णधार ऑयन मोर्गन (4 धावा) ची विकेट घेऊन संपूर्ण मॅचचे चित्रच बदलून टाकले.

5 – रोहितचे कर्णधार म्हणून नेतृत्व –
शेवटच्या 24 चेंडूंमध्ये इंग्लंडला जिंकण्यासाठी 46 धावा पाहिजे होत्या आणि दुखापतीमुळे कर्णधार कोहली मैदानाबाहेर गेला. त्याच्या गैरहजेरीत उपकर्णधार रोहित शर्माने टीमचे नेतृत्व सांभाळले आणि येथूनच मॅचची दिशा भारताकडे बदलली. कारण, रोहितने डावाच्या 17व्या ओव्हरमध्ये शार्दुलला गोलंदाजीसाठी बोलावले आणि या त्याच्या निर्णयाची कमाल दिसून आली.