धक्कादायक ! टीम इंडियाच्या ‘या’ माजी सलामीवीराने केली आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट या खेळामध्ये सध्या पैश्याची कमी नाही. मात्र प्रत्येक खेळाडूच्या बाबतीत हि बाब लागू होत नाही. त्यामुळेच भारताच्या एका माजी खेळाडूच्या बाबतीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे करोडो रुपये कमावणाऱ्या खेळाडूंच्या जमान्यात पैशाच्या तंगीमुळे एका माजी खेळाडूला आत्महत्या करावी लागली आहे.

भारतीय संघाचे माजी सलामीवीर वीबी चंद्रशेखर यांनी गुरुवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. चेन्नईतील माइलापोर येथील आपल्या निवासस्थानी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी भारतासाठी सात एकदिवसीय सामने खेळले असून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांची सरासरी अतिशय उत्तम होती. भारताच्या आक्रमक सलामीवीरांमध्ये त्यांची गणना होत असे.

त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दरवाजा वाजवला असता त्यांना काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता त्यांना चंद्रशेखर हे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांनी पोलिसांनी याची माहिती दिली. क्रिकेटमधील व्यवसायात नुकसान झाल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. त्यामुळे काही दिवसांपासून ते तणावाखाली देखील होते. तमिळनाडु प्रीमियर लीगमध्ये ते वीबी कांची वीरंस संघाचे ते मालक देखील होते. त्यामुळे या संघात त्यांना मोठा आर्थिक फटका बसल्यामुळे ते तणावाखाली गेले होते. मात्र चंद्रशेखर यांच्या या आत्महत्येमुळे क्रिकेट विश्वाला मोठा धक्का बसला असून अनेक भारतीय खेळाडूंनी ट्विट करून त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

धोनीला चेन्नईच्या संघात आणण्याचे श्रेय
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला चेन्नईच्या संघात घेण्याचे सर्व श्रेय चंद्रशेखर यांना जाते. २००८ मध्ये आयपीएलच्या सुरुवातीला त्यांनी या संघासाठी तीन वर्ष काम केले होते. त्यामुळे संघातील अनेक खेळाडूंना जोडण्याचे श्रेय त्यांना जाते.

आरोग्यविषयक वृत्त –