गौतम गंभीरमुळे ‘महिला’ क्रिकेटपटूला मिळाला ‘न्याय’, ‘अत्याचार’ करणाऱ्या ‘कोच’ची तुरुंगात ‘रवानगी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाला दोन विश्वचषक जिंकून देणारा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर सध्या राजकीय खेळपट्टीवर षटकार आणि चौकार मारत आहे. गौतम गंभीर पूर्व दिल्लीच्या जागेवरून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यामध्ये गौतम गंभीर विजयी होत खासदार झाला आहे. राजकारणी सर्वसामान्यांची बाजू ऐकून त्यांना मदत करतात. गौतम गंभीर यानेदेखील असेच केले आहे. काही दिवसांपूर्वी एका महिला क्रिकेटपटूने ट्विट करून गौतम गंभीरकडे मदत मागितली होती. या महिला क्रिकेटपटूने प्रशिक्षकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप करत गौतम गंभीरकडे मदत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर गौतम गंभीर या पीडित महिला क्रिकेटपटूला मदत करत आरोपी कोचला तुरूंगात धाडले आहे.

स्वत: गौतम गंभीरने ट्विट करून आरोपी क्रिकेट कोचला तुरुंगात पाठवल्याचे सांगितले आहे. गौतम गंभीर यांनी बुधवारी ट्विट करून सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका महिला क्रिकेटपटूने माझ्याशी संपर्क करून सांगितले होते की, तिचा प्रशिक्षक तिचे शारिरीक शोषण करत आहे. त्या प्रशिक्षकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. आता त्या महिला क्रिकेटपटूला तिच्या त्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी मदत केली जात असल्याचे गौतम गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या प्रकरणात मदत करणारे गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.


पीडित महिला क्रिकेटरने गौतम गंभीरकडे ट्विट करून मदत मागितली होती. त्यावर त्याने रिट्विट करून तिचा नंबर मागितला होता. पीडित महिला क्रिकेटरने नानू शर्मा नावाच्या ट्विटर अकांऊंटवरून गौतम गंभीरकडे मदत मागितली होती.

तिने ट्विटमध्ये लिहले होते की, हॅलो सर, मी दिल्लीची महिला क्रिकेटर आहे. आमचे प्रशिक्षक मला त्रास देत आहेत. आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तसेच तो मला करिअर संपवण्याची धमकी देत आहे. कृपया मला मदत करा. यानंतर गौतम गंभीरने त्या महिला क्रिकेटरला मदत केली. नेटकरी गौतम गंभीरचे कौतूक करून त्याला सलाम करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like