झिम्बाब्वेच्या हेमिल्टन मसाकाद्जानं बनवलं ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, मोठ-मोठया क्रिकेटर्सला देखील जमलं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – झिम्बाबवेच्या  हॅमिल्टन मसाकाद्जा याने काल अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. त्याच्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवत संघाने त्याला विजयी निरोप दिला. बांग्लादेशमध्ये सध्या सुरु असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत त्याने काल अफगाणिस्तानविरुद्ध 42 चेंडूत शानदार 71धावांची खेळी केली. त्याचबरोबर त्याने संघाला 7 विकेटने विजय मिळवून दिला. त्याचबरोबर टी-20 सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येची देखील त्याने आपल्या नावे नोंद केली. त्याने त्याच्या या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानचा सलग विजयाचा वारू देखील झिम्बाब्वने रोखला.

27 चेंडूत अर्धशतक

मसाकाद्जा याने 156 धावांचा पाठलाग करताना ब्रेंडन टेलर याच्याबरोबर फलंदाजीसाठी सुरुवात केली. दोघांनी ताबडतोब फलंदाजी करत संघाला चांगली सुरूवात करून दिली. त्याचबरोबर त्याने 27  चेंडूत अर्धशतक साजरे केले. त्याच्या टी-20  कारकिर्दीतील त्याने हे 11 वे अर्धशतक झळकावले. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 5 षटकार लगावले. त्याआधी अफगाणिस्तानने  रहमानुल्‍लाह गुरबाज याच्या शानदार 61 धावांच्या जोरावर 20 षटकांत 155 धावा केल्या.

टी-20 क्रिकेटमध्ये त्याने झिम्बाबवेच्या वतीने सर्वात आधिक धावा केल्या आहेत. त्याने 66 सामन्यांत 25.96 च्या सरासरीने 1662  धावा केल्या. दरम्यान, 18 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दींनातर त्याने या मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने एकूण 38 कसोटी सामन्यांत 2223 धावा तर 209 एकदिवसीय सामन्यांत  5658 धावा केल्या आहेत.

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like