‘बुमराह’ आणि ‘हार्दिक’च्या बाबतीत जहीर खाननं केला मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या पुढील वर्षी होणाऱ्या सीजन मधील फ्रेंचाइजी संघांमध्ये घोळ तीव्र झाला आहे. ट्रांसफर विंडो (Transfer Window) च्या साहाय्याने सर्व संघांनी खेळाडूंच्या संघात महत्वपूर्ण बदल केले आहेत. मुंबई इंडियंस (Mumbai Indians) च्या संघाने देखील खेळाडूंच्या यादीत नवीन नावे जोडली आहेत.

मुंबई इंडियंस ने दिल्ली कैपिटल्स (Delhi Capitals) च्या संघातून न्यूजीलैंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आणि राजस्थान रॉयल्स च्या संघातील वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा आपल्या संघात समावेश केला आहे.

संघात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) और हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सारखे वेगवान गोलंदाज असताना इतर गोलंदाजांचा समावेश केला जात आहे या मुंबई इंडियन्सच्या निर्णयावर खूप प्रश्न देखील निर्माण झाले. भारतीय संघाचे पूर्व वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचे कोचिंग स्टाफ चे सदस्य जहीर खान ने या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत.

दुखापतीस सामोरे जात आहेत बुमराह आणि हार्दिक
सध्या जहीर खान अबुधाबी मध्ये टी -१० लीग खेळत आहेत. त्यांनी तेथून व्हिडिओद्वारे संदेश दिला कि, हे वर्ष खूप कठीण असणार आहे कारण मुंबई इंडियन्स च्या खेळाडूंना अनेक दुखापतीस सामोरे जावे लागत आहे. हार्दिक पांड्या ने आत्ताच काही दिवसांपूर्वी कमरेच्या खालील हिस्स्याची लंडन मध्ये सर्जरी केली आहे, जसप्रीत बुमराह पण त्याच तणावाच्या कारणामुळे दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे.

तसेच जेसन बेहरेनडोर्फही पाठीच्या समस्याने पीडित आहे. आणि हा चिंतेचा विषय आहे. यामुळेच ट्रेंट बोल्ट व धवल कुलकर्णी यांना संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आगामी सीजन साठी आमच्या योजनेचा भाग आहे. आणि आम्ही आमच्या संघातील गोलंदाजी विभागाला अजून मजबूत करणार आहोत.

मुंबई ने रिलीज केले १० खेळाडू
मुंबई इंडियंस (Mumbai Indians) ने या सीजन साठी ट्रांसफर विंडो बंद होण्यापर्यंत आपले १० खेळाडू रिलीज केले आहेत, तसेच संघाने १८ खेळाडू कायम ठेवले आहेत. जहीर खान ने सांगितले कि, ‘मुंबई इंडियंसचे लक्ष घरगुती प्रतिभेला शोधण्यात आणि संधी देण्यावर आहे.

पण आम्हाला हे पण ध्यानात ठेवावे लागणार कि इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या पुढील सीजन साठी खेळाडूंची निलामी वेगळ्या प्रकारे होईल. त्यामुळे आम्हाला हा विचार करावा लागणार कि, आम्हाला कोणत्या दिशेने पाऊले उचलायची आहेत’. आईपीएल 2020 (IPL 2020) साठी खेळाडूंची निलामी १९ डिसेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.

आईपीएल चा सर्वात यशस्वी संघ
भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) चा ओपनर रोहित शर्माच्या कप्तानीमधील मुंबई इंडियंस (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्स ने सर्वाधिक चार वेळा हा खिताब आपल्या नावे केला आहे. संघाने या वर्षी फाइनल मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या कप्तानीत खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Superkings) वर मात करत खिताब जिंकला. तीन वेळेस चैंपियन राहणारी चेन्नई सुपरकिंग्सचा संघ या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. कोलकाता नाइटराइडर्स ने पण हा खिताब तीन वेळेस आपल्या नावे केला आहे.

Visit : Policenama.com