ICC च्या ‘या’ निर्णयानंतर २ खेळाडूंनी घेतली निवृत्ती, ‘या’ पेक्षा वाईट काळ काहीच असू शकत नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेटवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे यापुढे झिम्बाब्वे कोणत्याही प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळू शकणार नाही. लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर आयसीसीने या निर्णयाची घोषणा केली. झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये सरकारी हस्तक्षेपामुळे याआधी देखील आयसीसीने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाला इशारा दिला होता. मात्र त्यानंतर देखील सरकारी हस्तक्षेप कमी न झाल्याने आयसीसीने अखेर हा निर्णय घेतला. मात्र आयसीसीच्या या निर्णयामुळे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीवर विराम लागणार आहे. काही खेळाडूंनी यावर आपलं नाराजगी दर्शवत आपण याप्रकारे आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ इच्छित नसल्याचे म्हटले होते.

मात्र आयसीसीच्या या निर्णयामुळे निराश झालेल्या झिम्बाब्वेच्या दोन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. याविषयी अनेक खेळाडूंनी भाष्य करताना म्हटले कि, अजूनही आयसीसी काही सकारात्मक पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. संघाचा उपकर्णधार पीटर मूरने म्हटले कि, आयसीसीने आम्हाला अजून एक संधी द्यायला हवी. पुढे बोलताना तो म्हणाला कि, लहानपणापासून देशासाठी खेळण्याचे स्वप्न होते, त्यामुळे पायाखालची जमीन काढून घेतल्यासारखे वाटत आहे. नुकतीच कारकिर्दीला सुरुवात केली होती. यापेक्षा वाईट काळ माझ्यासाठी काहीच असू शकत नाही.

स्वीकारली निवृत्ती

त्याचबरोबर त्याने यावेळी क्रिकेटमधून निवृत्तीची देखील घोषणा केली. काल आयसीसीने निलंबनाची घोषणा केल्यानंतर लगेच संघाच्या खेळाडूं सोलोमन मायरनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आज पीटर मूरने निवृत्तीची घोषणा केली. पीटरने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या देशासाठी ८ कसोटी, ४९ एकदिवसीय आणि १९ टी -२० सामने खेळले आहेत.

Loading...
You might also like