Cricket | “मला विराट कोहलीसारखं व्हायचं आहे”, ‘लडाख गर्ल’च्या अप्रतिम फलंदाजीने वेधले सगळ्यांचे लक्ष (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजपासून टी-20 विश्वचषक 2022 (T-20 World Cup) ला (Cricket) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका (Sri Lanka) आणि नामिबिया (Namibia) यांच्यात पार पडला. या सामन्यात नवख्या नामिबियाच्या संघाने श्रीलंकेच्या संघाला धूळ चारून विजयी सलामी दिली. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना (Cricket) 23 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध (Pakistan) होणार आहे.

विराट कोहली (Virat Kohli) जगातील सर्वाधिक प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. क्रिकेट (Cricket) विश्वात विराटचे लाखो चाहते आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ लडाखमधील (Ladakh) एका तरूणीचा आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. या मुलीचा व्हिडिओ पाहून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) देखील प्रभावित झाली आहे.

 

या मुलीचा व्हिडिओ लडाखच्या शालेय शिक्षण विभागाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
त्यांनी या ट्विटमध्ये लिहिले आहे, “घरी माझे वडील आणि शाळेतील माझे शिक्षक मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात.
मी विराट कोहली सारखे खेळण्यासाठी प्रयत्न करेन असे ती म्हणाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

Web Title :- Cricket | i want to play cricket like virat kohli indian women captain harmanpreet kaur is also impressed by the video of the 6th class girl from ladakh