ICC World Cup 2019 : अंतिम सामन्यात ICC तोडू शकते आपली ‘परंपरा’, ‘या’ गोष्टीत बदल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत यावेळी आयसीसी आपल्या नियमांत बदल करण्याची शक्यता आहे. अंतिम सामन्यासाठी असणाऱ्या नियमांत आयसीसी बदल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. विजेत्या संघाला ट्रॉफी देताना आयसीसी सध्या जो नियम आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळे करणार असल्याचे समजत आहे.

सध्या विजेत्या संघाला आयसीसीचे अध्यक्ष ट्रॉफी देतात, मात्र यावेळी तो नियम बदलून माजी खेळाडूंच्या हस्ते ती ट्रॉफी देण्याचा आयसीसी विचार करत आहे. त्यामुळे १४ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सचिन तेंडुलकर किंवा मायकल क्लार्क तुम्हाला विजेत्या संघाला ट्रॉफी देताना दिसून येऊ शकते. त्याचबरोबर इंग्लंडमधील राजघराण्यातील कोणत्याही एका व्यक्तीला देखील हा सन्मान मिळू शकतो.

याविषयी बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये जेव्हा आयसीसी अध्यक्ष मुस्‍तफा कमाल यांच्याऐवजी आयसीसी चेयरमन एन श्रीनिवासन यांनी विजेत्या संघाला ट्रॉफी दिल्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यामुळे माजी खेळाडूंना यावेळी संधी देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर ब्रिटनच्या राजघराण्याला यासंदर्भात पत्र पाठवले असून त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे.

२०१५ मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात खराब अम्पायरिंगच्या मुद्द्यावर आयसीसी आणि बांग्‍लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्‍यक्ष मुस्‍तफा कमाल यांनी नाराज होत आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आयसीसी चेयरमन एन श्रीनिवासन यांच्या हस्ते विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली होती.

दरम्यान, यावेळी सचिन तेंडुलकरच्या हस्ते ही ट्रॉफी देण्यात यावी याची देखील मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्याचबरोबर ती युनिसेफची जोडला अअसल्याने तो त्यांचा गुडविल अँबेसिडर देखील असल्याने त्याला हि संधी आणि सन्मान दिला जावा.

 ‘ही’ पेये प्यायल्यास वजन होईल कमी, शरीराला मिळेल ऊर्जा

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

 तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

 ‘फिट अँड फाइन’ राहण्यासाठी नियमित करा हे उपाय

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप