Video : इंग्लडची मदत करतोय सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसीने वर्ल्डकप स्पर्धेत सर्वच संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे.

तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

इंग्लंड आज या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार असून त्याआधी फलंदाज नेट्समध्ये सराव करताना दिसून आले, मात्र यात सर्वात महत्वाचा गोलंदाज होता अर्जुन तेंडुलकर. त्याने नेट्समध्ये इंग्लंडच्या फलंदाजाना आपल्या गोलंदाजीने जेरीस आणले. त्याने इंग्लंसाठी गोलंदाजी करताना सर्वच फलंदाजांना ऊत्तम गोलंदाजी केली. मात्र इंग्लंडच्या कर्णधाराला त्याने आपल्या गोलंदाजीने विशेष जेरीस आणले. कर्णधार जो रूट याला अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळताना थोडा त्रास होत होता.

दरम्यान, या सगळ्यात इंग्लंडचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर असला तरीही या स्पर्धेत त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर उर्वरित तीन सामन्यांपैकी दोन सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे त्यांना अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्य विषयक वृत्त

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

व्यायामानंतर ‘या’ ७ चुका टाळा ; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

महाराष्ट्राभोवती कॅन्सरचा विळखा घट्ट ; रुग्णांची संख्या वाढली

सौंदर्य खुलवणारी ‘लिपस्टिक’ ठरतेय ‘जीवघेणी’