ICC World Cup 2019 : इंग्लंडच विश्‍वविजेता बनणार ? प्रशिक्षकांनी दिला ‘हा’ गुरु मंत्र !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडने २७ वर्षानंतर प्रवेश केला आहे. १९९२ मध्ये त्यांनी शेवटची वर्ल्डकप फायनल खेळली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा इंग्लंडकडे हा वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे. आजपर्यंत एकदाही त्यांना या विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. रविवारी होणाऱ्या फायनल सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जोरात तयारी करत असून या सामन्यात विजय मिळवण्याच्या निर्धाराने ते मैदानात उतरतील. त्यामुळे इंग्लंडच्या दृष्टीने या सामन्याला फार मोठे महत्व आहे.

साखळी सामन्यांत देखील खतरा

साखळी फेरीतील सामन्यांत देखील इंग्लंडवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका होता. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध शानदार कामगिरी करत त्यांनी स्पर्धेत पुनरागमन केले. आणि धडाक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. कर्णधार ऑयन मॉर्गन आणि संघ आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करत नव्हते. मात्र प्रशिक्षक ट्रेवर बेलीस यांनी आपल्या खेळाडूंना त्याच्या नैसर्गिक शैलीत खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर आपली क्षमता ओळखून खेळ करण्याचा देखील सल्ला त्यांनी दिला. बेलीस यांनी याविषयी अधिक बोलताना म्हटले कि, आम्हाला जिंकण्याचा आत्मविश्वास आहे, मात्र आम्ही अजिबात ओव्हरकॉन्फिडन्ट होणार नाही. आम्ही स्वप्न पूर्ण करण्याच्या खूप जवळ आहोत.

दरम्यान, त्यांनी खेळाडूंशी एक विशेष चर्चा करून खेळाडूंचा आत्मविशविस वाढवला आहे. त्याचप्रमाणे आपण आतापर्यंत एकही स्पर्धा न जिंकल्याने यावेळी आपल्याला हा वर्ल्डकप जिंकायचा आहे असेदेखील ते आपल्या खेळाडूंना म्हणाले.

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या