ICC World Cup 2019 : मोहम्मद शमीच्या हॅट्रिकनंतर पत्नी हसीन जहाँने वर्तविली ‘ही’ इच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत भारत ज्याप्रकारे खेळत आहे आणि सध्या भारतीय संघाचा फॉर्म बघता या स्पर्धेत भारतीय संघालाच संभाव्य विजेते म्हणून पहिले जात आहे. कर्णधार विराट कोहली आणि त्याचे शिलेदार या स्पर्धेत उत्तम कामगिरी करत असून भारतीय संघाने या स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही.

हि स्पर्धा आता मध्यावर आली असून त्यामुळे गुणतालिकेत सर्वात वर असलेले चार संघच सेमीफायनलमध्ये जाणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताना भारताची दमछाक झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत २२४ धावा केल्या. त्यानंतर बुमराह आणि शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने ११ धावांनी मिळवला.

मोहम्मद शमीने शेवटच्या षटकात हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या हॅट्ट्रिकनंतर शमीच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. एका खासगी वहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले कि, देशासाठी खेळणे ही प्रत्येक खेळाडूसाठी गर्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर संघासाठी सामना जिंकून देणे हि त्याहून चांगली आणि मोठी गोष्ट आहे. यावेळी तिने थेट शमीविषयी भाष्य करणे टाळले. त्याचबरोबर भारतीय संघाला हि स्पर्धा जिंकायची असेल तर कामगिरीत सातत्य राखणे गरजेचे आहे.

दरम्यान, भारतीय गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु असून त्याच्या पत्नीने मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला होता. तसेच शमीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचंही हसीन जहाने म्हटलं होतं. देशाचे नाव जरी त्याने या सामन्यात उंचावले असले तरी एकेकाळी त्याला शरमेने देशवासीयांवसमोर या प्रकरणामुळे मान झुकवावी लागली होती. मात्र या सगळ्या प्रकरणात बीसीसीआयने त्याला साथ देऊन त्याच्या कामगिरीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली.

आरोग्य विषयक वृत्त

साखरेऐवजी गुळ टाकून घ्या चहा ; होतील ‘हे’ फायदे

गरोदरपणात खावीत ‘ही’ फळे ; होतील ‘हे’ खास फायदे

एनर्जी ड्रिंक्समुळे उर्जा खरंच वाढते का ? जाणून घ्या सत्य

चेहऱ्यावरील बदलांमुळे मिळतात ‘या’ आजारांचे संकेत