ICC World Cup 2019 : कपिल देव म्हणाले, धोनी नव्हे तर भारताची ‘ही’ आहे मोठी समस्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – या वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या संथ फलंदाजींमुळे टीकाकारांचा धनी बनलेल्या महेंद्रसिंग धोनी याचे भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी समर्थन केले आहे. कपिल देव यांनी म्हटले कि, त्याच्यावर टीका करणे अयोग्य आहे. ज्या खेळाडूचे नाव ऑल टाइम ग्रेट खेळाडूंमध्ये येते त्याच्यावर अशा प्रकारे टीका करणे योग्य नाही. त्याचबरोबर टीका करून तो काही पुन्हा २० वर्षांचा होणार नाही.

टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी धोनीचे समर्थन करताना म्हटले कि, संपूर्ण संघाचा विचार केला तर धोनी उत्तम कामगिरी करत आहे. मात्र लोकांच्या अपेक्षा तो पूर्ण करू शकत नाही. पुढे बोलताना ते म्हणाले कि, आपण आपल्या खेळाडूंकडून प्रमाणाबाहेर अपेक्षा करत आहोत. मात्र ते आपली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत.

विराट कोहलीच्या आक्रमक खेळापुढे आणि आक्रमक कप्तानीपुढे धोनीचे शांत असणे हा एका आदर्श आहे. त्याच्या विकेटकिपिंगची तुलना दुसऱ्या कोणत्याही खेळाडूंबरोबर होऊ शकत नाही. त्याचबरोबर धोनी २०-२५ वर्षांचा असताना ज्याप्रकारे खेळत होता त्याप्रमाणे आता तो खेळू शकत नाही.

डीआरएसची संख्या वाढवण्याची मागणी
त्याचबरोबर बोलताना कपिल त्यांनी यांनी आयसीसीला डीआरएसची संख्या वाढवण्याची विनंती केली. काल खेळवण्यात आलेल्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात भारताने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर आपला रिव्ह्यू गमावल्यानंतर हि मागणी पुढे आली आहे. त्यांनी म्हटले कि, नॉकआउट राउंड मध्ये एकापेक्षा जास्त रिव्ह्यू असायला हवेत. याविषयी त्यांनी आयसीसीला विनंती करताना म्हटले कि, दोन किंवा तीन रिव्ह्यू असल्यास दोन्ही संघांसाठी ते फायद्याचे राहील. त्याचबरोबर त्यांनी भारतीय गोलंदाजांचे कौतुक करताना म्हटले कि, या स्पर्धेत भारतीय गोलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like