ICC World Cup 2019 : कोणी बेरोजगार तर कोणी सेल्समन, न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूंची वाईट अवस्था

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर न्यूझीलंड वर्ल्डकपचा दावेदार समजला जात होता, त्याचप्रमाणे त्यांनी लौकिकाला साजेशी कामगिरी करत भारताचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला. भारतासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला असणार यात शंका नाही. मात्र फायनलमध्ये त्यांच्या समोर यजमान इंग्लंड असल्याने हा सामना रंगतदार होणार आहे.

भारतीय संघात विराट, धोनी यांसारखे खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे न्यूझीलंडच्या संघात देखील दमदार खेळाडू आहेत. मात्र भारतीय खेळाडूंना या खेळातून जितक्या प्रमाणात पैसे मिळतात किंवा तितकी प्रसिद्धी आणि पैसे न्यूझीलंडच्या खेळाडूंना मिळत नाही. क्रिकेट खेळत असताना देखील ते त्यांचे राहणीमान अत्यंत साधे ठेवतात. त्याचबरोबर निवृत्त झाल्यानंतर देखील ते अत्यंत साधे जीवन जगतात. भारतात ज्याप्रमाणे सामान्य माणूस जीवन जगतो तसेच जीवन न्यूझीलंडचे खेळाडू त्यांच्या देशात जगतात. काहीवेळा तर निवृत्तीनंतर त्यांना घर चालवणे आणि जीवन जगणे देखील अवघड जाते. उत्तर संघाना मिळणाऱ्या मानधनाच्या तुलनेत न्यूझीलंडच्या खेळाडूंना फार कमी मानधन मिळते. यामुळे निवृत्तीनंतर त्यांना आर्थिक टंचाई भासल्यास छोटी मोठी कामे करून जीवन जगावे लागत आहे. भारतीय खेळाडूंसारखे ते त्यांच्या देशात प्रसिद्ध नसतात तसेच पैश्याने देखील ते तितके श्रीमंत नसतात.

निवृत्तीनंतर वाईट परिस्थिती

क्रिस केर्न्स आणि मैथ्यू सिंक्लेयर या दोन खेळाडूंनी न्यूझीलंडचे नाव अनेकदा उंचावले आहे. खेळाडू म्हणून त्यांनी नाव कमावल्यानंतर निवृत्तीनंतर मात्र त्यांना जीवन जगताना फार अडचणींना सामोरे जावे लागत आहे. क्रिस केर्न्स याचे नाव काही वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते. मात्र या सगळ्यात त्याचे फार पैसे खर्च झाले. यामुळे सध्या तो बेकार असून जीवन जगण्यासाठी तो सध्या ऑकलंडमध्ये बस धुण्याचं आणि ट्रक चालवायचे काम करत आहे.

मैथ्यू सिंक्लेयर आहे बेरोजगार

पदार्पणाच्या सामन्यातच द्विशतक मारणाऱ्या या खेळाडूची सध्या फार वाईट अवस्था आहे. निवृत्तीवर त्याच्यावर मोठं आर्थिक संकट ओढवले असून २०१३ नंतर तो खूप वर्ष बेरोजगार होता. यामुळे त्याच्या कुटुंबाला फार त्रास सहन करावा लागला. शिक्षण पूर्ण झाले नसल्याने त्याला कुठे नोकरी देखील मिळत नव्हती. मात्र शेवटी त्याला नेपियर मध्ये सेल्स पर्सन म्हणून नोकरी मिळाली.

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ ५ फायदे

‘मुतखडा’ या भयंकर आजारासाठी ‘तुळस’ वरदानच, जाणून घ्या

‘फिश पेडिक्यूर’चे फायदे आणि नुकसान, जाणून घ्या

‘शरीराच्या शुध्दीसाठी आणि मनाच्या सात्विकतेसाठी’ उपवास गरजेचा

‘या’ तेलांनी मसाज करा ; केसातील कोंडा आणि इतर समस्यांपासून मुक्ती मिळवा !

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’