ICC World Cup 2019 : ‘टॉप’ ४ मधील एक संघ पडू शकतो बाहेर ? पाकिस्तान पोहचणार सेमीफायनलला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. मात्र या सामन्यात झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानने जबरदस्त कमबॅक करत काल झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवला.

त्यानंतर आता या विजयानंतर पाकिस्तानच्या सेमिफायनलला पोहचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पाकिस्तानच्या विजयाने यजमान इंग्लंडच्या पुढच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५० षटकांत ३०८ धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला २५९ धावांत रोखलं.

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम ११ पॉईंट्स मिळवत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर १० पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आहे. टीम इंडिया ९ पॉईंट्नी तिसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

सेमीफायनलमध्ये जाणार पाकिस्तान

सध्याच्या गुणतालिकेचा विचार केला तर वरील चार संघाना सेमीफायनलमध्ये जाण्याची सर्वात जास्त संधी आहे, मात्र त्याचबरोबर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन संघाना देखील सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानचे पाच गुण झाले आहेत.

त्यामुळे उर्वरित पुढील तीनही सामन्यांत त्यांनी विजय मिळवल्यास त्यांना सेमीफायलचे दरवाजे उघडे राहतील. पाकिस्तानने उर्वरित सामन्यात विजय मिळवल्यास त्यांचे ११ गुण होतील. पाकिस्तानच्या वर लंकेचा संघ असून ते एका सामन्यात जरी पराभूत झाले आणि इतर सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे १० गुण होतील.

तर बांगलादेशसुद्धा एका सामन्यात पराभतू झाल्यास त्यांनाही १० गुण मिळवता येतील. या दोन्ही संघांना भारताशी लढायचे आहे. त्यात विजय मिळवणं लंकेला आणि बांगलादेशला कठीण आहे.

इंग्लडचा पराभव महत्वाचा

मात्र या सगळ्यात पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये जायचे असेल तर इंग्लंडच्या सामन्यांच्या गणिताकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांचे तीन सामने उरले आहेत. यातील दोन सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यास पाचव्या क्रमांकावरील संघ सेमीफायनलला जागा पक्की करू शकतो. इंग्लंडला स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध सामने खेळायचे आहेत. तिन्ही सामने टक्करचे होणार यात काही शंका नाही, त्यामुळे पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून वाव आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

आरोग्य विषयक वृत्त

दुखण्याने त्रासलात ? मग, ‘हे’ खा, पेनकिलरला उत्तम पर्याय

ओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास जा डॉक्टरांकडे ! 

कॅल्सिफिकेशन आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे आणि त्यावरील उपाय

‘हे’ सोपे उपाय अवलंबा आणि नैसर्गिक पद्धतीने हार्मोन्सचे नियंत्रण करा