‘तो’ योगायोग जुळून आल्याने 1992 चा ‘विश्‍वविजेता’ पाकिस्तान यंदाही वर्ल्डकप जिंकणार !

लंडन : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास दोन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे.

या सगळ्यात काल पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला आणि यावर सोशल मीडियावर चर्चा होण्यास सुरुवात झाली. याला कारणच तसेच महत्वाचे आहे. कारण या सामन्याचा आणि १९९२ सालच्या वर्ल्डकपचा एक योगायोग जुळून आला आहे. त्यामुळे १९९२ चा विश्वविजेता संघ पुन्हा एकदा जग्गजेता होऊ शकतो.

यावेळी पाकिस्तानच्या बाबतीत प्रचण्ड योगायोग जुळताना दिसून येत आहे. १९९२च्या वर्ल्ड कपमधील सराव सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. त्यानंतर वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत त्यांना वेस्ट इंडिजविरुद्ध १० विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.

या वर्ल्ड कपमध्येही पाकिस्तानला पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने पराभूत केलं आणि सराव सामन्यात देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने या गोष्टीला अधिक बळ मिळत आहे. त्यानंतर १९९२ मध्ये इंग्लंडविरद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता,यावेळी श्रीलंकेविरुद्धचा झाला आहे. तसेच पहिल्या सामन्यातील पराभवानंतर त्यांनी जोरदार कमबॅक करत यजमान इंग्लंडचा १४ धावांनी पराभव देखील केला आहे. १९९२ साली देखील असेच घडले होते.

दरम्यान, या स्पर्धेत देखील पाकिस्तानबरोबर आतापर्यंत तसेच घडत आले आहे, त्यामुळे आता यावेळी देखील पाकिस्तान तसाच चमत्कार करून दाखवेल अशी पाकिस्तानी प्रेक्षक आणि चाहत्यांना आशा आहे. १९९२ मध्ये पाकिस्तानने सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद मिळवले होते.