ICC World Cup 2019 : भारतीय संघामागचे ‘शुक्लकाष्ठ’ संपेना ; धवन, भुवनेश्वर नंतर ‘हा’ अष्टपैलू खेळाडू जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. वर्ल्ड कप २०१९ मधील गुणतालिकेत ९ पॉईंट्ससह न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर आठ- आठ पॉईंट्स मिळवत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय संघ शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणारा शिखर धवन उजव्या अंगठ्याला दुखापत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला संधी देण्यात आली आहे.

त्यानंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे २ ते ३ सामने खेळू शकणार नाही. भारत आपला पुढील सामना शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला देखील दुखापत झाली आहे. आज सकाळी सराव करत असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याचा चेंडू पायाला लागल्याने तो जखमी झाला आहे. यावेळी त्याला खूप वेदना होत होत्या. त्याची दुखापत हि फार मोठी नसून लवकरच तो यातून बरा होईल असे सांगितले जात आहे.

दरम्यान, विजय शंकरला दुखापत झाली असली तरी तो बरा होईल. या आधी शिखर धवनची दुखापतसुद्धा गंभीर नव्हती असं म्हटलं जात होतं. पण नंतर त्याला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे यावेळी देखील विजय शंकर याच्या बाबतीत तसे काही घडायला नको अशी प्रार्थना भारतीय पाठीराखे करताना दिसून येत आहेत.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.