ICC World Cup 2019 : शोएब अख्तर म्हणतो तर ‘या’ संघावर येऊ शकतो ‘बॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ धडपडताना दिसून येत आहे. गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला इतर संघावर अवलंबून राहावे लागणार आहे. कारण इतर संघांच्या जय पराजयावर त्यांचे सेमीफायनलमधील स्थान अवलंबून आहे. आज त्यांचा सामना अफगाणिस्तानबरोबर होत असून या सामन्यात विजय मिळवणे त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे आजचा सामना अटीतटीचा होणार यात शंका नाही.

त्याअगोदर पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर याने अफगाणिस्तान संघावर आरोप केले आहेत. या स्पर्धेत एकही विजय न मिळवलेल्या संघाकडून पराभूत होण्याची भीती सतावत आहे. शोएब अख्तर याने आरोप करताना म्हटले की, भारत अफगाणिस्तानच्या संघाच्या फलंदाजीत सुधारणा करू शकला नाही. त्याचबरोबर त्याने म्हटले की, अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे आयकार्ड तपासले तर त्यांच्या संघावर बंदी येऊ शकते.

भारतात फलंदाजी सुधारली नाही

याविषयी बोलताना तो म्हणाला की, अगोदर अफगाणिस्तान संघाचे घरचे मैदान हे पेशावर, रावळपिंडी होते. त्यानंतर ते दिल्ली आणि नोयडामध्ये गेले. डेहराडून त्यांचे घरचे मैदान झाले. भारताने त्यांच्यावर खूप गुंतवणूक केली आहे. मात्र ते त्यांना फलंदाजीत सुधारू शकले नाहीत.

अफगाणिस्तानवर येऊ शकते बंदी

अफगाणिस्तानवर बोलताना तो म्हणाला की, अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे आयकार्ड तपासले तर त्यांच्या संघावर बंदी येऊ शकते. त्याचबरोबर त्याने म्हटले की, जर आयकार्ड तपासणी केली तर त्यांचे सर्व नातेवाईक पेशावर आणि काराचीमधील दिसून येतील. पुढे त्याने म्हटले की, आम्ही ३० लाख अफगाणी नागरिकांना राहायला घरे दिली आहेत. आम्ही त्यांना पसंद करतो, मात्र ३० जून रोजी होणाऱ्या सामन्यात हे प्रेम मध्ये येणार नाही. पाकिस्तानला दोन गुणांची नितांत आवशक्यता आहे.

https://twitter.com/AsharJawad/status/1144700234217467904

आरोग्यविषयक वृत्त – 

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार

केसांना ‘डाय’ करताय ? मग आधी हे वाचा, आणि लक्षात ठेवा