Coronavirus Impact : ICC कोरोना व्हायरसच्या विळख्यात, घ्यावा लागला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगासाठी कोरोना व्हायरस मोठा धोका बनला आहे. आतापर्यंत जगभरात 15 हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. या व्हायरसच्या संक्रमणात जगभरातील 3 लाख लोकांचा समावेश आहे. भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 400 वर गेला आहे. तर आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. क्रिडाविश्वावर देखील याचा परिणाम झालेला आहे. याच्या विळख्यात क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसी (ICC) देखील आली आहे.

घरुन काम करणार आयसीसीचे कर्मचारी
आयसीसीने हा निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या व्हायरसपासून वाचण्यासाठी त्यांचे अधिकाधिक कर्मचारी घरुन काम करतील. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी आयसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून किक्रेट कॅलेंडरसंबंधित व्हिडिओ कॉन्फरेन्स करण्याचा विचार करत आहे.

आयसीसीचे प्रवक्ता म्हणाले की, जगभरातील बाकी भागांसारखेच आयसीसीचे अधिकारी देखील दिशानिर्देशांचे पालन करत आहेत आणि आता आमचे अनेक कर्मचारी घरुन काम करत आहेत. आमची प्राथमिकता कर्मचाऱ्यांचे काम न थांबवता त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं आहे. आमच्या टीमकडे घरुन काम करण्याची क्षमता आहे, त्यामुळे आमचे कर्मचारी त्यांची कुटूंब, समुदाय सुरक्षित ठेवून काम करत आहेत.

टी-20 विश्व कपावर सावट
बीसीसीआयने कोरोना व्हायरसचा धोका ओळखून आपले कार्यालय यापूर्वीच बंद केले आहे आणि आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले आहे. तसेच कोरोनाचे सावट टी 20 सामन्यावर राहणार आहे. पुरुषांचा टी 20 विश्व कप ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे परंतु तेथील सरकार कोरोनाला रोखण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे टी 20 च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे.