‘मास्टर ब्लास्टर’ सचिनचा ICC नं ‘हा’ सन्मान देऊन केला गौरव !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याचा आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून सन्मान केला आहे. क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिनचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केल्याने सर्व भारतीयांना खूप आनंद झालेला आहे. सचिन तेंडुलकर बरोबरच ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने काल लंडनमधील एका कार्यक्रमात याची घोषणा केली.

सचिनच्या नावाची घोषणा करताना आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी म्हटले कि,या तिघांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर त्यांनी आयसीसीच्या वतीने तिघांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याचप्रमाणे त्याने कसोटीमध्ये १५ हजारापेक्षा जास्त धावा आणि एकदिवसीय सामन्यांत १८ हजारापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या नावावर सर्वाधिक १०० शतकांचा देखील विक्रम आहे.
दरम्यान, याआधी भारताच्या कपिल देव, अनिल कुंबळे, बिशन सिंह बेदी आणि सुनील गावस्कर यांचा आयसीसीने हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.

जाणून घ्या कढीपत्त्याचे फायदे !

केळी खाण्याचे १० फायदे, जाणून घ्या

मक्याचा उपमा खाण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

‘हे’ उपाय करा अन् मेकअप न करता दिसा एकदम सुंदर, जाणून घ्या

मुलांना नैसर्गिकरित्या गोरे करतात ‘हे’ ५ घरगुती उपाय; जाणून घ्या

हिंगात अनेक औषधी गुणधर्म, ‘हे’ २० रामबाण उपाय, जाणून घ्या