T – 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा बदल करणार ICC, 16 हून वाढवून ‘एवढ्या’ टीम केल्या जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यावर्षी टी – २० वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे, ज्यासाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. यावेळी क्रिकेटची ही स्पर्धा १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी – २० विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. पण आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) संघांच्या संख्येबाबत मोठा बदल करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे जर आयसीसीची योजना कार्यान्वित झाली तर २०२३ ते २०३१ सत्रात होणाऱ्या टी – २० वर्ल्ड कपमध्ये संघांची संख्या वाढविण्यात येईल. आयसीसी २०२३ – २०३१ च्या सत्रात टी – २० विश्वचषकात संघांची संख्या १६ वरून २० पर्यंत वाढविण्याचा विचार करीत असल्याचा दावा एका माध्यम अहवालात करण्यात आला आहे.

फुटबॉलसारखी लोकप्रियता मिळवण्याचा हेतू :
मिळालेल्या माहितीनुसार खेळाची व्याप्ती वाढविण्यासाठी टी – २० फॉर्मेटला सर्वोत्तम मार्ग मानणारे आयसीसी क्रिकेटच्या लोकप्रियतेच्या दृष्टीने फुटबॉल, बास्केटबॉलसारख्या खेळाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करण्याच्या पर्यायावर विचार करीत आहे. २०२३-३१ च्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट दिनदर्शिकेवरील या विषयावर चर्चा करणे हा महत्वाचा मुद्दा आहे. या सत्रातील पहिला टी २० विश्वचषक २०२४ मध्ये होईल.

दरम्यान, जागतिक पातळीवरील मीडिया हक्कांच्या बाजारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक वर्षी जागतिक स्पर्धा आयोजित करण्याचा आयसीसीने प्रस्ताव दिला असून विश्वचषकातील संघांची संख्या प्रेक्षकांची संख्याही वाढवेल. त्यामध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व होण्याची शक्यता वाढेल. आयसीसीने अमेरिकेला एक मोठी बाजारपेठ म्हणून पाहिले आहे. आणि येथे खेळाला चालना देण्यासाठी अलीकडे अनेक प्रयत्न केले आहेत. अगदी भारतीय संघाने अमेरिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध टी – २० सामना खेळला आहे. जर संघांची संख्या वाढविली तर कॅनडा, जर्मनी, नेपाळ आणि नायजेरियाच्या संघांनाही यात खेळण्याची संधी मिळू शकेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/