भारताकडून हिसकावून घेऊ T-20 वर्ल्ड कप 2021 चं ‘यजमान’ पद, ICC नं दिली BCCI ला धमकी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटचे सर्वात बलाढ्य आणि श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयला आयसीसीने टी२० वर्ल्ड कप हिसकावून घेण्याची धमकी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयसीसीने बीसीसीआयकडे भारत सरकारकडून करात सूट मिळावी अशी मागणी केली होती, पण अध्यक्ष सौरव गांगुली तसे करू शकले नाहीत. आयसीसीने बीसीसीआयला १८ मे पर्यंत टॅक्समध्ये सूट देण्याबाबत लेखी देण्यास सांगितले होते, पण कोरोना विषाणूमुळे बीसीसीआय ते करू शकले नाही. बीसीसीआयने आयसीसीकडे ३० जूनपर्यंत मुदत मागितली आहे, पण इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने त्याला स्पष्टपणे नकार दिला आहे. कोरोना विषाणूमुळे यंदा आयसीसी टी२० वर्ल्ड कप पुढे ढकलला जाणार आहे. रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी२० वर्ल्ड कप आता २०२२ मध्ये होईल. त्याचबरोबर भारतात पुढच्या वर्षी टी२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे, पण कर मुद्यावरून आयसीसी आणि बीसीसीआय मध्ये वाद आहे.

बीसीसीआयची प्रतिक्रिया
माध्यमांच्या वृत्तानुसार, आयसीसीच्या या धमकीवर बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, विश्व क्रिकेट संस्था असे पाऊल उचलून आत्महत्या करू इच्छित नाही. वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की त्यांना आयसीसीच्या संचालकांवर पूर्ण विश्वास आहे आणि ते भारताकडून टूर्नामेंट घेऊन आत्मघाती पाऊल उचलणार नाहीत. हे आयसीसीचे नव्हे तर काही लोकांचे वैयक्तिक प्रश्न असल्याचा दावा बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केला. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, जर असे केले तर बीसीसीआय नाही, तर आयसीसीचे नुकसान होईल.

अशा वादग्रस्त विधान करणार्‍या लोकांना संस्थेतून हद्दपार करण्याचे आवाहन बीसीसीआय अधिकाऱ्याने आयसीसीला केले. बीसीसीआय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूंविरूद्ध लढत आहे आणि अशावेळी आयसीसीचे काही अधिकारी अशा गोष्टी करून दबाव निर्माण करण्याचे काम करत आहेत.

शशांक मनोहर आहे वादाचे कारण ?
आयसीसी चीफ शशांक मनोहर आणि बीसीसीआयचा छत्तीसचा आकडा आहे. आयसीसीने म्हटले आहे की, आयसीसी बिझनेस कॉर्पोरेशनने कर सूट संबंधित मुदत मागे घेण्यास सहमती दर्शवली नाही. पण बीसीसीआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, आयसीसीमध्ये सदस्य देशांचे संचालक असतात आणि बर्‍याच संचालकांना याची माहिती नाही, जी एक अतिशय आश्चर्यकारक बाब आहे. अध्यक्ष सौरव गांगुली योग्य उत्तर देतील अशी आशा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.