नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने काल विंडीजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव करत आपला पाचवा विजय साजरा केला. याचबरोबर भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने सेमीफायनलमधील आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र या सगळ्यात काल झालेल्या सामन्यात मधल्या फळीचा फॉर्म हि भारतासाठी मोठी चिंतेची बाब झाली आहे. कालच्या सामन्यात भारताची मधली फळी ढेपाळल्यानंतर शेवटी महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. अफगाणिस्तानविरुद्ध देखील भारतीय संघाची मधली फळी फेल गेली होती.
सलामीवीर फलंदाज शिखर धवन जखमी झाल्याने के. एल. राहुल याला सलामीला संधी दिल्याने त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर याला संधी देण्यात आली मात्रत्याने देखील या संधीचा फायदा घेतला नाही. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात त्याने काही विशेष कामगिरी केलेली नाही. त्याचबरोबर विजय शंकरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२ सामन्यात २२३ धावा केल्या आहेत.त्यामुळे त्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्यात यावी अशी मागणी क्रीडा रसिकांकडून करण्यात येत आहे.
ऋषभ पंतला संघात स्थान हवे
त्यामुळे त्याच्या जागेवर शिखर धवनच्या ऐवजी संधी देण्यात आलेल्या रिषभ पंत याला खेळवण्यात यावे अशी मागणी क्रीडा रसिकांकडून होत आहे.मागील दोन वर्षात भारताने वरच्या फलंदाजांनी केलेल्या उत्तम कामगिरीने विजय मिळवलेला आहे. मात्र मधल्या फळीत खेळणाऱ्या फलंदाजांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.
मोठे फटके मारण्याची गरज
भारतीय संघात रोहित शर्मा उत्तम फलंदाजी करत असून तो सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मात्र मधल्या फळीत भारताला मोठे फटके खेळणाऱ्या खेळाडूंची गरज आहे. त्यामुळे रिषभ पंत मोठे फटके खेळण्यास सक्षम आहे. आयपीएलमध्ये त्याच्या आक्रमक खेळीने तो गोलंदाजांची पिसे काढत असतो. त्यामुळे विजय शंकरच्या जागी त्याची निवड करण्याचा निर्णय संघ व्यवस्थापन घेण्याचा विचार करत आहे. धावांचा पाठलाग करताना आक्रमक फटके खेळणाऱ्या खेळाडूची या परिस्थितीत भारतीय संघाला गरज आहे. मात्र यामध्ये विजय शंकर यशस्वी होऊ शकला नाही.
दरम्यान, रिषभ पंत याने आतापर्यंत पाच एकदिवसीय सामने खेळले असून त्यात १३०. ९० च्या स्ट्राइक रेटने त्याने ९३ धावा केल्या आहेत.
सुंदर आणि ग्लोइंग त्वचा हवीये.. ‘या’ टिप्स वापरून घरी पण घेऊ शकता स्पा
वजन कमी करण्यासाठी खा ‘ही’ फळभाजी
पोटाच्या समस्या कधीच होणार नाहीत, जर सांभाळल्या ‘या’ आठ गोष्टी
ऑफिसमध्ये बसूनही करता येतील व्यायामाचे हे प्रकार
दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास
चित्रपट निर्माते अनुराग कश्यपची मुलगी आलियाच्या ‘बोल्ड’ फोटोंनी पाण्यात लावली ‘आग’
Video : BF सोबत ‘एन्जॉय’ करतेय अभिनेता आमिर खानची मुलगी इरा, पहा तिचा ‘भन्नाट’ डान्स