ICC World Cup 2019 : सेमीफायनलपुर्वीच इंग्लंडच्या मनात ‘या’ कारणामुळं ‘धाकधुक’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील साखळी सामन्यांचा आज शेवटचा दिवस असून ९ जुलै आणि ११ जुलै रोजी सेमीफायनलचे सामने होणार असून ९ जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एकमेकांशी भिडण्याची दाट शक्यता आहे. तसेच ११ जुलै रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना यजमान इंग्लंडबरोबर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनतर आता स्पोर्ट्समेलने दावा केला आहे कि, या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात यजमान इंग्लंडला प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार नाही. याचे कारण देखील तितकेच महत्वाचे आहे कि, या सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी या सामन्याची सर्वात जास्त तिकिटे खरेदी केलेली आहेत. त्यामुळे संपूर्ण मैदानात जास्त संख्येने भारतीय प्रेक्षकच असणार आहेत.

ICC World Cup : इंग्लैंड को सता रहा डर, कहीं भारतीयों से ही न भर जाए स्टेडियम

मात्र आता यावरून आयसीसीवर टिका करण्यात येत असून तिकीट वाटपाच्या पॉलिसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. अनेक जण असा विचार मांडत आहेत कि, यजमान संघासाठी काही तिकिटे राखीव ठेवायला हवीत. यावर क्रिकेट वर्ल्ड कप चीफ स्टीव एलवर्दी यांनी सांगितले कि, असे करणे अवघड आहे. आयसीसीद्वारे घालून देण्यात आलेल्या नियमांनुसार हि प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शीपणे पार पडत असते. कोणत्याही संघाला याचा वेगळा लाभ देता येत नाही. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सांगितल्या प्रमाणे हि तिकीट पॉलिसी तयार करण्यात अली आहे. जेणेकरून १६ वर्षांखालील तरुण वर्ग सामने वागण्यासाठी येतील आणि या सामन्यांना नवीन प्रेक्षक लाभतील.

दर्शकांना प्राधान्य
याविषयी क्रिकेट वर्ल्ड कप चीफ स्टीव एलवर्दी यांनी सांगितले कि, आम्ही या स्पर्धेत दर्शकांना प्राधान्य देण्याचा विचार केला आहे. त्यामुळे मैदानात सर्वात जास्त दर्शक असायला हवेत. दरम्यान, सेमीफायनलमधील तिकिटे री-सेलिंग मध्ये देखील एक लाख रुपयांच्या वर किंमत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता कि, प्रेक्षकांना या सामन्याविषयी किती आवड आहे. त्याचबरोबर एजंट देखील या वेबसाईटवर नजर ठेवून आहेत. त्यामुळे या तिकिटांची किंमत अजून वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या पुरुषांना येऊ शकते ‘नपुंसकत्व’

‘पांढरे डाग’ घालवण्याचे घरगुती उपाय

व्हिटॅमिन ‘डी’च्या कमतरतेमुळे लहान मुलांना होऊ शकतो ‘हाय बीपी’चा धोका

घरी तयार केलेले लोणी चवीसह देते आरोग्य !

‘या’ १३ आरोग्य समस्यांवर आहेत ‘हे’ रामबाण उपाय

पावसाळ्यात काजळाने होते इन्फेक्शन ! अशी घ्या काळजी

असा दूर करा ‘विसरभोळेपणा’, जगा आनंदी आयुष्य

केसगळतीच्या समस्येवर ‘हे’ घरगुती उपाय ठरतील वरदान

You might also like