‘हिटमॅन’ रोहित बद्दल गौतमचं ‘गंभीर’ विधान, टेस्टमध्ये ‘यशस्वी’ झाला तर ठीक नाहीतर…

नवी दिल्ली :वृत्तसंस्था- आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये पाच शतक झळकावून विक्रम केलेल्या रोहित शर्मा याला अखेर भारतीय संघात सलामीवीर म्हणून स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. सलामीवीर के. एल. राहुल याच्या जागी रोहित शर्मा याला सलामीला संधी देण्यात आली आहे. एकदिवसीय सामन्यात खोऱ्याने धावा करणाऱ्या रोहित शर्मा याच्यासाठी हि उत्तम संधी आहे. मात्र त्याच्या या निवडीनंतर भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने त्याच्याविषयी मोठे भाष्य केले आहे.

रोहितला राखीव ठेऊन काही फायदा नाही
माजी सलामीवीर गौतम गंभीर याने यावर बोलताना म्हटले कि,रोहित शर्मा हा सीमित षटकांच्या क्रिकेटमधील अतिशय उत्तम आणि शानदार खेळाडू आहे. याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिलेली संधी त्याच्यासाठी करो किंवा मरो अशी राहणार आहे. त्याने या संधीचे सोने केले नाही तर भारतीय संघाला दुसऱ्या खेळाडूचा पुन्हा विचार करावा लागेल. त्यामुळे मी घरच्या सामन्यांमध्ये त्याला सलामीवीर म्हणून बघत आहे. त्याचबरोबर त्याची संघात निवड केली असेल तर त्याला राखीव म्हणून न ठेवता 11 खेळाडूंमध्ये संधी द्यायला हवी, असेदेखील गंभीर याने म्हटले.

रोहित आणि डिव्हिलियर्सने उडवली होती झोप
आयपीएलच्या दरम्यान रोहित शर्मा आणि एबी डिव्हिलियर्स यांनी माझी झोप उडवल्याचे देखील यावेळी गौतम गंभीर याने सांगितले. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कपिटल्सचा कर्णधार राहिलेल्या गौतम गंभीर याने म्हटले कि, रोहीत सीमित षटकांच्या क्रिकेटमधील बादशहा आहे. तसेच कर्णधार म्हणून रोहीत आणि डिव्हिलियर्स यांनी माझी झोप उडवल्याचा देखील त्याने पुनरुच्चार केला.

सहा वर्षात 27 कसोटी सामने
रोहित शर्मा याने आपल्या सहा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत 27 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 39.62 च्या सरासरीने 1585 धावा केल्या आहे. यामध्ये तीन शतकांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –