Ind Vs Aus 2nd Test Match : भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेटने दणदणीत विजय

मेलबर्न : पहिल्या कसोटीत (India vs Australia) मानहानीकारक पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने नव्या जोमाने दुसर्‍या कसोटीत पुनरागमन केले असून ऑस्ट्रेलियावर ८ विकेटने विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.

मेलबर्न मैदानावर हा भारताचा चौथा विजय ठरला आहे. पहिल्या डावात शतक झळकविलेल्या कप्टन अजिंक्य रहाणे याने शुभमन गिलच्या साथीने हा विजय साकारला आहे. शुभमन गिल याने नाबाद ३५ धावा केल्या तर रहाणे याने नाबाद २७ धावा केल्या. त्याअगोदर मयंक अगरवाल ५ चेतेश्वर पुजारा ३ धावा काढून बाद झाले होते. २ बाद १९ अशा धावसंख्येवरुन गिल व रहाणे यांनी आवश्यक असलेल्या ७० धावा करुन ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून विजय मिळविला. भारताचा हा ऑस्ट्रेलियातील ८ वा विजय ठरला आह.

भारताचे ऑस्ट्रेलियातील या पूर्वीचे विजय

मेलबर्न ३० डिसेंबर ते ४ जानेवारी १९७८
सिडने ७ ते १२ जानेवारी १९७८
मेलबर्न ७ ते ११ फेब्रुवारी १९८१
अ‍ॅडलेड १२ ते १६ डिसेंबर २००३
पर्थ १६ ते १९ जानेवारी २००८
अ‍ॅडलेड २६ ते २० डिसेंबर २०१८
मेलबर्न २६ ते ३० डिसेंबर २०१८