IND vs ENG : ऑस्ट्रेलियात विजय मिळवून देणारे ‘हे’ 4 खेळाडू भारतीय टीममधून वगळले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताला ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवून देणारे भारतीय टीमचे अनेक खेळाडू इंग्लंडविरूद्धच्या आगामी सीरीजमध्ये खेळताना दिसणार नाहीत. भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या टेस्ट सीरीजसाठी जी टीम घोषित केली आहे, त्यामध्ये या चार खेळाडूंना बाहेर काढण्यात आले आहे. हे खेळाडू आहेत – टी नटराजन (T Natarajan), नवदीप सैनी (Navdeep Saini), हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw). भारत आणि इंग्लंडमध्ये चार मॅचची टेस्ट सीरीज होणार आहे. सीरीजची पहिली मॅच 5 फेब्रुवारीपासून खेळली जाईल.

भारताने इंग्लंडच्या विरूद्ध टेस्ट सीरीजसाठी मंगळवारी टीमची घोषणा केली. आता पहिल्या दोन टेस्ट मॅचेससाठी टीम निवडली गेली आहे. विराट कोहली या टीमचा कर्णधार असणार आहे. टीममध्ये हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, केएल राहुल आणि अक्षर पटेल सुद्धा परतले आहेत. अक्षरला जखमी झालेल्या रवींद्र जडेजाची जागा मिळाली आहे.

मोठे खेळाडू परतण्याचा परिणाम असा झाला आहे की, टी नटराजन, नवदीप सैनी, पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी यांना टीमच्या बाहेर काढावे लागले आहे. नटराजन आणि सैनी त्या भारतीय टीमध्ये सहभागी होते, ज्यांनी आजच (मंगळवार) ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. हनुमा विहारीने तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर डेब्यू करणारे 4 खेळाडू मोहम्मद सिराज, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना चांगल्या कामगिरीचे बक्षीस देखील मिळाले आहे. या चौघांना इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरीजच्या टीमध्ये सहभागी केले आहे. निवडकर्त्यांनी इंग्लंडविरूद्ध टेस्ट सीरीजसाठी 18 सदस्यांची टीम निवडली आहे.

भारतीय टीम (2 टेस्ट मॅचसाठी) : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, आर. अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल.