IND vs WI 1st Test : किंग कोहली सह सलामीवीर मयांक अपयशी, रहाणेनं सावरला ‘डाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि विंडीजमध्ये काल सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यांत पहिल्या दिवशी भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर मयांक अगरवाल लवकर बाद झाल्याने भारतीय संघाला आपला डाव सावरता आला नाही. मात्र त्यानंतर अजिंक्य राहणे याने आधी के. एल. राहुल याच्या मदतीने तर तो बाद झाल्यानंतर हनुमा विहारी याच्या मदतीने भारताचा डाव सावरत भारताला दिवस अखेर 6 बाद 203 धावांची मजल मारून दिली.

नाणेफेक जिंकून विंडीजने भरताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत भारताला सुरुवातीलाच धक्के देत भारताची 3 बाद 25 अशी अवस्था केली. सलामीवीर मयांक केवळ 5 धावा करून बाद झाला तर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार कोहली हे केवळ अनुक्रमे 2 आणि 12 धावा करून बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणे याने राहुल याच्या मदतीने भारताचा डाव सावरला. मात्र राहुल 44 धावांवर बाद झाल्याने रहाणे याने हनुमा विहारीच्या मदतीने भारताच्या डावाला आकार दिला. मात्र विहारी देखील 32 धावांवर बाद झाला. दिवस अखेर अजिंक्य रहाणे देखील 81 धावांवर बाद झाला. विंडीजच्या वतीने केमार रोच याने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी ऋषभ पंत 20 धावांवर तर रविंद्र जडेजा 3 धावांवर खेळत होते. त्यामुळे आज भारताचा डाव लवकरात लवकर गुंडाळण्याचा विंडीजचा प्रयत्न असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like