‘युनिव्हर्सल बॉस’ गेलने मोडले ब्रायन लाराचे ‘हे’ २ विक्रम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि विंडीज यांच्यादरम्यान सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल याने दोन विक्रम मोडीत काढले. कालच्या सामन्यात त्याने ९ धावा करतानाच पहिला विक्रम मोडीत काढला. कालच्या सामन्यांत २८० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या विंडीजच्या गेलने ९ धावा करताच विंडीजचा माजी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याचा विक्रम मोडीत काढला.

या सामन्यांत त्याने ब्रायन लाराचा २९९ एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम मोडीत काढला. ब्रायन लारा याने त्याच्या कारकिर्दीत २९९ एकदिवसीय सामने खेळले होते. तर कालचा सामना गेलचा ३०० वा एकदिवसीय सामना होता. त्यामुळे आता तो विंडीजचा सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर त्याने ब्रायन लाराच्या नावावर असणारा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम देखील मोडीत काढला. त्यामुळे आता त्याच्या नावावर ३०० सामन्यांत १० हजार ४०८ धावा झाल्या असून त्याने धावसंख्येच्या बाबतीत ब्रायन लाराला मागे टाकले आहे. दुसऱ्या सामन्यात ११ धावा करताच त्याने हा विक्रम मोडीत काढला आहे.

दरम्यान, त्याला दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकण्याची देखील संधी आहे.  एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल याने समान म्हणजेच २५ शतके साजरी केली आहेत. शेवटच्या सामन्यात शतक करून गेलकडे हा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याचबरोबर मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त