पंतने ‘धोनी’ची ‘जागा’ घेतली ?, विराटसह सोशल मीडियावर ‘कौतुक’ !

फ्लोरीडा : वृत्तसंस्था – भारतीय संघाची फ्लोरिडा येथे वेस्ट इंडीज विरुद्ध टी-२० मालिका सुरु आहे. त्यात टी-२० मालिकेचा पहिला सामना कालच झाला. त्यात भारताने ४ गडी राखून वेस्ट इंडीजवर मात केली. विषेश म्हणजे या मालिकेतच नाही तर वेस्ट इंडिज दौऱ्याला जाण्यासाठी कॅप्टन कुल महेंद्र सिंह धोनीने नकार दिला होता. त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले होते. निवड समितीचा हा निर्णय पंतने निवड समितीचा निर्णय योग्य ठरवत आपली चुणुक पहिल्याच सामन्यात दाखवली आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही त्याचे कौतुक केले आहे.

अखेरच्या षटकात नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. वेस्ट इंडिजचा फलंदाज पोलार्ड फलंदाजी करत होता. त्याची विकेट महत्त्वाची होती. कारण एकट्या पोलार्डने त्यांचा डाव सावला होता. तेव्हा तिसऱ्या चेंडूवर सैनीने गोलंदाजी केली. तेव्हा सैनीचा फुलटॉस चेंडू थेट पॅडवर आदळला. यावेळी सैनीचं अपिल पंचांनी फेटाळून लावलं. त्यानंतर पंतने जोरदार अपिल करत कोहलीला डीआरएस घेण्यास सांगितलं. कोहलीने पंतच्या सांगण्यावरून डीआरएस घेतला आणि हा निर्णय भारताच्या बाजूने लागला. त्यामुळे भारताला एक विकेट मिळाली आणि विजय मिळवण्यात यश आले.

कोणत्याही सामन्यात डीआरएस घेण्याच्या योग्य निर्णयाबाबतीत धोनी चाणाक्य आहे. याबाबतीत त्याचा कोणी हात धरू शकत नाही. तसंच धोनीची नजर आणि चपळाई नेहमीच भारताच्या कामी आलेली आहे. आता पंतने त्याच्या या पहिल्याच सामन्यात त्याची चुरशी आणि चपळाई दाखवल्याने आता पंत धोनीच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

दरम्यान, टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीजने भारतासमोर ९६ धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान १७.२ षटकांत पूर्ण करत विजय मिळवला. या सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचे वर्चस्व राहिले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like