‘टीम इंडिया’च्या जर्सीवर ‘काँग्रेस-समाजवादी’चा आक्षेप, ICC ने दिले ‘ठासून’ उत्‍तर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वर्ल्ड कपमध्ये ३० जूनला इंग्लडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ भगवी जर्सी परिधान करणार आहे आणि यामुळे आता एका नवीन वादाला तोंड फुटले आहे. राजकीय पक्षांनी या जर्सीवर आक्षेप घेऊन नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने भगव्या रंगाच्या जर्सीवर आक्षेप घेतला आहे. त्यांच म्हणणं आहे की, केंद्र सरकारला खुश करण्यासाठी बीसीसीआयने भगव्या रंगाची निवड केली. भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सांगितले की, आम्ही बीसीसीआयला कलर कॉम्बिनेशन पाठवले होते BCCI ने त्याच रंगाची निवड केली जी त्यांना योग्य वाटली.

आतापर्यंत अधिकृतपणे भारतीय क्रिकेट संघाची भगव्या रंगाची जर्सी समोर आलेली नाही. सोशलमिडीयावर जर्सीचे वेगवेगळे फोटो शेअर केले जात आहेत. ३० जूनला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑरेंज रंगातील जर्सी परिधान करेल हे स्पष्ट झाले आहे.

हा आहे नियम
एका सामन्यात एकाच रंगाची जर्सी परिधान करून दोन्ही संघ सामना खेळू शकत नाहीत. अशामध्ये दोन्हीपैकी एका संघाच्या जर्सीच्या रंगात बदल होणे गरजेचे आहे.

इंग्लंडला या कारणामुळे प्राधान्य
अशा प्रकरणात आयोजक संघाला त्यांच्याच रंगाची जर्सी परिधान करण्याची परवानगी मिळते.

देशाला भगव्या रंगात रंगवून टाकण्याची मोदींची इच्छा – सपा
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी म्हणाले की, मोदी संपूर्ण देशाला भगवे करू इच्छितात. मोदींना सांगू इच्छितो की झेंड्याला रंग लावणारा मुस्लिम होता. तिरंग्यात अजूनही रंग आहेत पण भगवाच का? तिरंगी रंगात जर्सी असती तर खूप चांगले झाले होते.

मोदी सरकारचे भगवे राजकारण – काँग्रेस
काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नसीम खान म्हणाले की, मोदी सरकार जेव्हापासून सत्तेवर आली आहे तेव्हापासून भगवे राजकारण करत आहे. तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे. हे सरकार प्रत्येक गोष्टीचे भगवेकरण करत आहे.

भगव्या रंगापासून काय अडचण – भाजप
सपाच्या प्रतिक्रियेवर भाजप नेते राम कदम यांनी म्हंटले की, भगव्या रंगाविषयी विरोधी पक्षांना काय अडचण आहे. कधी भगवा दशतवाद तर कधी भगवा रंगाच्या मुद्यावर आक्षेप घेतला जातो. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस जवळ काही मुद्देच नाहीत म्हणून या अशा मुद्यावर ते जाणूनबुजून वाद निर्माण करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय