आगामी 2 वर्षे टीम इंडिया खेळणार नॉन स्टॉप क्रिकेट, BCCI नं जाहीर केले वेळापत्रक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पुढील दोन वर्षे भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रक जाहीर केले असून हे वेळापत्रक भारतीय क्रिकेट चाहत्यांना खूष करणारे आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 2022 चा विश्वचषक होईपर्यंत पुढील 15 महिन्यांपर्यंत विराट कोहली अँड कंपनीला नॉन-स्टॉप क्रिकेट खेळावे लागेल. कोविड – 19 मुळे बर्‍याच मालिका आणि स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. यासह, 2021 ते 2023 दरम्यान तीन वेगवेगळे विश्वचषक होतील. टीम इंडियाच्या या व्यस्त वेळापत्रकात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंसाठी ब्रेक मागितला आहे.

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021) नंतर थकवा दूर करण्यासाठी भारतीय क्रिकेटपटूंना दोन आठवड्यांचा ब्रेक मिळाला पाहिजे, असे रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. शास्त्री म्हणतात की, बायो-बबलमध्ये राहणे म्हणजे ‘मानसिकदृष्ट्या थकवणारे’ आहे. सप्टेंबरमध्ये युएईमध्ये आयपीएल 2020 पासून भारतीय खेळाडूंनी ब्रेक घेतला नाही. आयपीएलनंतर हा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला ज्यामध्ये त्यांनी चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले.

2021 आणि 2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे संपूर्ण वेळापत्रक ….

एप्रिल ते मे 2021
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2021)

जून ते जुलै 2021
जागतिक कसोटी स्पर्धा (जून)
भारत विरुद्ध श्रीलंका (3 वनडे, 5 टी 20)

आशिया चषक
जुलै 2021
भारत विरुद्ध झिम्बाब्वे (3 वनडे)

जुलै ते सप्टेंबर 2021
भारत विरुद्ध इंग्लंड (5 कसोटी)

2021 ऑक्टोबर
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (3 वनडे,5 टी 20)

ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2021
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप

नोव्हेंबर ते डिसेंबर 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड (2 कसोटी, 3 टी -20)

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत
(3 कसोटी, 3 टी 20)

2022 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे संपूर्ण वेळापत्रक

जानेवारी ते मार्च 2022
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (3 एकदिवसीय, 3 टी -20)
भारत विरुद्ध श्रीलंका (3 कसोटी, 3 टी -20)

एप्रिल ते मे 2022
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2022)

जुलै ते ऑगस्ट 2022
भारत विरुद्ध इंग्लंड (3 वनडे, 3 टी -20)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (3 एकदिवसीय, 3 टी -20)

सप्टेंबर 2022
आशिया चषक

ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2022
आयसीसी वर्ल्ड टी 20 चषक (ऑस्ट्रेलिया)

नोव्हेंबर ते डिसेंबर 2022
भारत वि बांगलादेश (2 कसोटी, 3 टी 20)
भारत विरुद्ध श्रीलंका (5 एकदिवसीय)

2023 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचे वेळापत्रकः

2021 जानेवारी
भारत वि न्यूझीलंड (3 एकदिवसीय, 3 टी -20)

फेब्रुवारी ते मार्च 2023
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (4 कसोटी, 3 एकदिवसीय, 3 टी20)