भारताची ‘बादशाही’ कायम, बांगलादेशला पराभूत करत 7 व्यांदा जिंकला ‘अंडर-19’ एशिया कप !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या अंडर- 19 संघाने श्रीलंकेत झालेल्या आशिया चषकात विजय मिळवून आशियामध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत हा ऐतिहासिक विजय मिळवला. फिरकीपटू अथर्व अंकोलेकर याने भारताकडून शानदार गोलंदाजी करत भारताच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने 28 धावा देत बांग्लादेशच्या 5 खेळाडूंना माघारी पाठवले. 106 धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशचा संघ अवघ्या 101 धावांत ऑल आउट झाला.

india under 19 cricket team, india u19 team, youth asia cup 2019, under 19 asia cup, dhruv jurel, atharva ankolekar, इंडिया अंडर 19 क्रिकेट टीम, यूथ एशिया कप 2019, अंडर 19 एशिया कप

जुनिअर आणि सिनिअर दोन्ही करंडक भारताकडे –

सलग दुसऱ्या मालिकेत भारताने बांग्लादेशचा पराभव करत विजय मिळवला आहे. मागील महिन्यात देखील इंग्लंडमधील तिरंगी मालिकेत भारताने बांग्लादेशचा पराभव करत मालिकेचे विजेतेपद मिळवले होते. त्याआधी मागील वर्षी देखील रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताच्या वरिष्ठ संघाने देखील बांग्लादेशचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.

india under 19 cricket team, india u19 team, youth asia cup 2019, under 19 asia cup, dhruv jurel, atharva ankolekar, इंडिया अंडर 19 क्रिकेट टीम, यूथ एशिया कप 2019, अंडर 19 एशिया कप

करण लाल याने भारताची लाज राखली –

कोलंबोमधील आर प्रेमदासा स्‍टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव केवळ 106 धावांमध्ये आटोपला होता. मात्र भारताच्या करण लाल याने 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत त्याने संघाला 100 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

https://hindi.news18.com/news/sports/cricket-india-under-19-cricket-team-wins-youth-asia-cup-after-defeatin-bangladesh-in-final-2421979.html

बांग्लादेशच्या तळाच्या फलंदाजांनी केला संघर्ष –

बांग्लादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकलेली असताना बांग्लादेशच्या तळाच्या फलंदाजांनी मात्र चांगला संघर्ष करत भारताचा विजय लांबवला होता. मात्र अखेर अंकोलेकर याने 3 चेंडूत 2 विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.

आरोग्यविषयक वृत्त –

काकडीचे ‘हे’ १५ अद्भूत आरोग्यवर्धक लाभ, जाणून घ्या

अंडर आर्म्सचे केस काढण्यासाठी ‘रेजर’ वापरत असाल तर ‘हे’ जरूर वाचा

‘या’ सोप्या ६ उपायांनी काही मिनिटांत दूर होईल कानदुखी, जाणून घ्या

कोथिंबीरचे ‘हे’ ९ फायदे, अशाप्रकारे करा वापर

कोरफड लाभदायक आहेच, पण होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणामही, जाणून घ्या

‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे

पन्नाशीनंतरही तरुण राहण्यासाठी स्त्री-पुरुषांनी करावीत ‘ही’ १६ कामे

दररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय

तुम्ही जर प्रेग्नेंट असाल तर ‘या’ ८ गोष्टींची विशेष काळजी घ्या