टीम इंडियाचा ‘नवा’ फॉर्मूला ! मैदानावर चांगली कामगिरी केल्यास विमान प्रवासात मिळणार ‘ही’ खास सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघातील खेळाडूंचे राहणीमान पाहून आपण अनेकदा गैरसमज करून घेतो. बिजनेस क्लास मधून प्रवास, शानदार हॉटेलमध्ये राहण्यामुळे आपल्याला त्यांचे लाइफस्टाइल भारी वाटते. मात्र प्रत्येक खेळाडूला या विमान प्रवासाची आणि हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा मिळत नाही.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंना विशेष मेहनत करावी लागते. त्यामुळे सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला बिझनेस क्लासमधून प्रवास करण्याची सुविधा मिळते. मात्र आता याचा नवीन फॉर्म्युला समोर आला असून या सुविधेचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंना सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करावे लागते.
सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात इशांत शर्मा याला हि संधी मिळाली होती तर दुसऱ्या सामन्यात मोहम्मद शमी याला हि संधी मिळाली होती.

virat kohli, rohit sharma, team india, india vs south africa, cricket, sports news, विराट कोहली, रोहित शर्मा, टीम इंडिया

टीम बॉण्डिंग अभ्यासाचा आहे भाग –
हि योजना टीम बॉण्डिंग अभ्यासाचा एक भाग असून नुकत्याच झालेल्या सामन्यात चांगले प्रदर्शन केलेल्या खेळाडूंना याचा फायदा होईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेचा लाभ केवळ चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनाच मिळत असून बाकी खेळाडूंना मिळत नाही. तसेच संघाच्या उपकर्णधाराला देखील यापुढे सुइट्स रूम मिळणार आहेत. याआधी हा सुइट्स रूम सामनावीराचा पुरस्कार मिळालेल्या खेळाडूला दिली जात असे. मात्र आता यापुढे ती उपकर्णधाराला मिळणार असून तो संघाचा महत्वाचा सदस्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Visit  :Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like