पाकच्या ३२ क्रिकेटपट्टूच्या वेतनाएवढ ‘वेतन’ भारताच्या किंग कोहलीला, विराटला मिळते ‘इतके’ वेतन

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव करत या स्पर्धेत आपली विजयी मालिका कायम राखली आहे. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर संघावर टीका केली होती. १९९२ पासून सलग सात वेळा भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत केले आहे. त्यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याच्यावर माजी क्रिकेटपटूंनी मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी क्रिकेट संघावर देखील मोठ्या प्रमाणात टिका केली. त्याचबरोबर पाकिस्तानी संघात दोन गट पडले असल्याचे देखील मीडियाने सांगितले. त्यामुळे पाकिस्तनी संघाची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली.

त्याचबरोबर कर्णधार सरफराज अहमद याने जर काही वेडंवाकडं झालं तर फक्त मीच घरी जाणार नाही, अशी धमकी देखील आपल्या संघाला दिली त्यामुळे इतर खेळाडूंसह कर्णधार देखील घाबरलेला आहे. मात्र या सगळ्यात सोशल मीडियावर आता भारत आणि पाकिस्तामधील खेळाडूंच्या वेतनाची चर्चा सुरु झाली आहे. भारतीय खेळाडूंना मिळणारे वेतन हे कैक पटीने अधिक असल्याचे यात दिसून येत आहे. भारतीय खेळाडूंना ज्याप्रकारे ग्रेडनुसार वेतन मिळत त्याचप्रमाणे पाकिस्तानी खेळाडूंना देखील वेतन मिळते. भारतीय कर्णधार विराट याला अ श्रेणीत वार्षिक ७ कोटी रुपये वेतन मिळते तर पाकिस्तानच्या संपूर्ण संघाचे वेतन हे ७ कोटी रुपये होत आहे. त्यामुळे फक्त तोंड वाजवणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंचे वेतन देखील त्यांच्या खेळाच्या दर्जानुसारच देण्यात येत आहे.

अशा प्रकारे मिळते वेतन

भारत
अ श्रेणी : ७ कोटी रुपये
ब श्रेणी : ५ कोटी रुपये
क श्रेणी : ३ कोटी रुपये
ड श्रेणी : १ कोटी रुपये

पाकिस्तान
अ श्रेणी : ४८ लाख रुपये
ब श्रेणी : ३० लाख रुपये
क श्रेणी : २१ लाख रुपये
ड श्रेणी : १२ लाख रुपये
इ श्रेणी :६ लाख रुपये

आरोग्याविषयक वृत्त

” उपवास ” हा आरोग्यासाठी फायदेशीर मात्र या लोकांसाठी घातक

स्लीपर चप्पल पायांसाठी वेदनादायी

ही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण

वारंवार लघवीला येत असेल तर करा ‘ हे ‘ उपाय

मानसिक रोग होणार कि नाही हे कळणार आता “आवाजावरून “

तेजस्वी डोळ्यांसाठी गुणकारी औषधी वनस्पतींचा वापर

सिने जगत

अभिनेत्री प्रियंका चोप्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सदस्य बनली आहे का ? कारण…

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.