IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाला मोठा झटका ! वन डे आणि T-20 सीरिजमूधन बाहेर पडला डेविड वॉर्नर, टेस्ट खेळण्याबाबतही सस्पेन्स

सिडनी : वृत्तसंस्था – ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 3 वन डे मॅचच्या सीरिजवर कब्जा केला आहे. परंतु या विजयादरम्यान ऑस्ट्रेलियासाठी चांगली बातमी नाही. धमाकेदार फॉर्ममध्ये असलेला ओपनर डेव्हिड वॉर्नर जखमी झाल्याने अखेरच्या वन डेशिवाय टी-20 सीरिजमधून बाहेर गेला आहे. पहिल्या टेस्ट मॅचपूर्वी फिट होण्यासाठी वॉर्नरकडे आता 18 दिवसांचा वेळ असेल. अशावेळी त्याच्या टेस्ट सीरिजमध्येसुद्धा खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे. वॉर्नर भारताच्या विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये फिल्डिंग करतेवेळी जखमी झाला होता. ज्यानंतर त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. स्कॅन रिपोर्ट आज येईल.

सीरिजमधून बाहेर होण्याचा धोका
ऑस्ट्रेलिया मीडियानुसार, वॉर्नर टी-20 सीरिजसह टेस्ट सीरिजमधूनसुद्धा बाहेर होऊ शकतो. स्वत: कर्णधार एरॉन फिंचने मॅचनंतर म्हटले आहे की, सीरजच्या शेवटच्या मॅचसाठी नवीन पार्टनर शोधावा लागेल. टीमचा आणखी एक खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने मॅचनंतर म्हटले की, त्याला आशा आहे की, वॉर्नर लवकर बरा होऊन परतेल; परंतु त्याने हेसुद्धा म्हटले की, वॉर्नरला मैदानात खूपच वेदना होत होत्या. मार्नस लबूशेननेसुद्धा या गोष्टीचे संकेत दिले की, सध्याच्या सीझनमध्ये वॉर्नरशिवाय टीमला खेळण्याची सवय लावून घ्यावी लागेल.

वॉर्नर नाही तर कोण ?
ऑस्ट्रेलियाला सध्या शेवटच्या वन डे आणि टी-20 सीरिजसाठी नवा ओपनर शोधावा लागेल. याशिवाय सीलेक्टरलासुद्धा ठरवावे लागेल की, जर वॉर्नर टेस्ट सीरिजच्या बाहेर गेला तर नंतर नवीन ओपनिंग जोडीमध्ये कोण असेल. जो बर्न्स विल पुकोवस्कीसोबत ओपनिंग करेल किंवा अन्य कुणी? पुकोवस्की टेस्टमध्ये डेब्यू करू शकतो. परंतु, बर्न्सची यावेळी स्थानिक क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली झालेली नाही.