‘हा’ विजय विराट कोहलीची ‘डोकेदुखी’ वाढवणार, ‘हिटमॅन’ रोहितचं मोठं ‘विधान’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील पहिल्या टी-20 सामन्यात झालेल्या पराभवांनंतर भारतीय संघाने राजकोट आणि नागपुरमधील दोन्ही सामने जिंकत बांग्लादेशच्या संघाचा 2-1 असा पराभव केला. या मालिका विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा हा फार आनंदात असून त्याने या विजयाचे श्रेय आपल्या गोलंदाजांना दिले. रोहितने दीपक चाहर, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे यांची स्तुती केली तसेचत्याने म्हटले कि, हा विजय विराटसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

विराटची डोकेदुखी वाढणार
या सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर आनंदित असणाऱ्या रोहित शर्माने म्हटले कि, जर भारतीय संघ असेच प्रदर्शन करत राहिला तर कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीसाठी हि फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे. सर्वच खेळाडू शानदार कामगिरी करत असल्याने टी-20 वर्ल्डकपमध्ये कुणाला संधी द्यायची हि फार मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

गोलंदाजांनी मिळवला विजय
या सामन्यातील विजयाचे श्रेय त्याने गोलंदाजांना दिले. मैदानात पडणाऱ्या धुक्यामुळे गोलंदाजी करणे अवघड होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. खेळाडूंनी जबाबदारी घेत हि कामगिरी केली आणि विजय मिळवला.

अशा पद्धतीने मिळवला विजय
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 174 धावा केल्या. राहुल याने शानदार 52 तर श्रेयस अय्यर याने 62 धावा केल्या. मनीष पांडे याने देखील 13 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या उतरलेल्या बांगलादेशचा संघ या धावांचा पाठलाग करू शकला नाही आणि संपूर्ण संघ केवळ 144 धावाच करू शकला. भारताच्या वतीने दीपक चाहर याने हॅट्रिकसह सहा विकेट घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

Visit : Policenama.com