कसोटी मालिकेपुर्वी न्युझीलंडला मोठा झटका, ‘या’ दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 21 फेब्रुवारीपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे. मात्र, यापूर्वीच न्यूझीलंड संघाला मोठा झटका बसला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू आणि लेग स्पिनर टॉड एस्ले याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गोलंदाज टॉड एस्लेने टी 20 आणि वनडे क्रिकेटकडे लक्ष देण्यासाठी त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यासह तो भारत अ विरुद्धच्या आगामी प्रथम श्रेणी मालिकेत न्यूझीलंड ए संघाकडून खेळणार नाही.

33 वर्षीय टॉडची कसोटी कारकीर्द जवळपास आठ वर्षांची होती. या दरम्यान त्याने केवळ पाच कसोटी सामने खेळले आहे. 2012 मध्ये त्याने श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने शेवटचा सामना नुकताच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे खेळला होता. टॉडने म्हटले आहे की, कसोटी क्रिकेट खेळणे हे माझे स्पप्न आहे आणि आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तसेच कसोटी क्रिकेटबद्दल बोलताना टॉड म्हणाला, रेड बॉल म्हणजे क्रिकेटचे शिखर आहे, परंतु त्यासाठी अधिक वेळ देण्याची देखील गरज आहे.

ऑस्ट्रेलियामधील यजमानांविरुद्धच्या मालिकेत तिसरा कसोटी सामना खेळण्याची संधी टॉडला मिळाली होती. पण न्यूझीलंडने ही मालिका गमावली होती. टॉडने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कँटरबरीकडून 303 विकेट घेतल्या. तसेच कॅटबरीकडून खळेताना तो सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने कसोटी मधून निवृत्ती घेतल्याने न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा