ICC World Cup 2019 : आजदेखील सामना रद्द झाला तर काय होणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत काल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना आज पुढे खेळवण्यात येणार आहे. काल न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत ४६. १ षटकात ५ बाद २११ धावांची मजल मारली असताना पावसाला सुरुवात झाली आणि त्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला नाही. त्यामुळे आज उर्वरित सामना खेळवण्यात येणार आहे. काल ज्या स्थितीत सामना होता त्याच्यापुढे तो खेळवण्यात येणार आहे.

या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला असल्याने आज भारतीय चाहते पाऊस न पडण्याची अपेक्षा करत आहेत. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रीडारसिक नाराज होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही एका संघाला विजयी घोषित करावे लागणार आहे. या सामन्यात साखळी सामन्यांप्रमाणे गुण दिले जाणार नाहीत.

कोण जाणार फायनलमध्ये…

जर आज देखील पाऊस पडला तर याचा सर्वात जास्त फटका कुणाला बसणार याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे या दोन संघांपैकी कोण फायनलला जाणार यावर सोशल मीडियावर देखील चर्चा सुरु आहे. साखळी सामन्यांमध्ये ज्याने चांगले प्रदर्शन केले आहे त्याचा उपयोग या संघाना याठिकाणी होऊ शकतो. यामुळे हा सामना रद्द झाला तरीदेखील भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार आहे.

साखळी सामन्यांत गुणतालिकेत सर्वात वर

स्पर्धेच्या साखळी सामन्यांत भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. यामध्ये भारताने ९ सामन्यांमध्ये ७ सामन्यांत विजय मिळवला असून एका सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर न्यूझीलंडला ९ पैकी ५ साखळी सामन्यांत विजय मिळवता आला असून ३ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे सामना पावसामुळे रद्द झाला तरी भारतीय संघ गुणतालिकेत वरच्या स्थानावर असल्याने थेट फायनलमध्ये जागा मिळू शकते.

त्यामुळे पावसाने आजचा सामना रद्द करावा लागला तरीदेखील भारतीय संघ साखळी सामन्यांतील कामगिरीच्या जोरावर फायनलमध्ये धडक मारेल.

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात