ICC World Cup 2019 : जडेजाने मैदानात आठवून दिला ११ वर्षपुर्वीचा ‘इतिहास’, ‘या’ कारणामुळे इंडिया ‘जिंकणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ च्या सेमी फायनल मध्ये इंडिया आणि न्यूझीलँड यांच्या सामना सुरु आहे. न्यूझीलँडने पहिल्यांदा बॅटिंगला सुरुवात केली, परंतू ही सुरुवात चांगली होऊ शकली नाही. मार्टिन गप्टिल १ धाव करुन बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजाने हॅनरी निकोल्स याला बाद करत सामन्यातील २ रा बळी घेतला. जडेजाने हा बळी घेतल्यानंतर त्यांने ११ वर्ष जुना इतिहास मोडला. या आधी सेमी फायनलमध्ये इंडिया आणि न्युझीलँड सामना झाला होता. त्यावेळी देखील जडेजाने इंडियाचा दुसरा बळी घेतला. यावेळी टीम इंडिया सामना जिंकली होती. हा सेमीफायनलचा सामना २००८ मध्ये अंडर १९ साठी खेळवण्यात आला होता यात इंडियाला विजय मिळाला होता.

२००८ साली अंडर १९ वर्ल्डकप मध्ये इंडियन टीमचा कर्णधार विराट कोहली होता. यावेळी न्युझीलंडचा कर्णधार केन विलियमसन होता. सेमी फायलन मध्ये दोघांचा सामना झाला होता. यात जडेजानेच दुसरा बळी घेतला होता. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यात जडेजाने बोल्ड काढाला होता. हीच मॅच इंडियाने ३ विकेटने जिंकली होती.

विशेष म्हणजे आज देखील सेमीफायनलमध्ये न्युझीलँडनेच टॉस जिंकला होता. आणि बॅटिंग घेतली आहे. हेच दोन्ही संघ अंडर १९ ला सेमी फायनल मध्ये एकमेकांसमोर आल्या होत्या आणि याच सामन्यात ४ थ्या ओवरला विकेट निघाली होती.

अंडर १९ चा वर्ल्ड कप आणि क्रिकेट वर्ल्ड कप २०१९ सेमीफायनल बद्दल पत्रकार परिषेदत विराट कोहली आणि केन विलियमसन यांना विचारण्यात आले तेव्हा दोघांनी आश्चर्य व्यक्त केले. कोहली ने सांगितले की, मला वाटलं नव्हतं, पण मला विश्वास आहे की विलियमसनला ते आठवत असेल. जेव्हा उद्या आमची मॅच होईल तेव्हा मी त्याला ते आठवण करुन देईल. अंडर १९ नंतर आता सिनीअर टीमचे कर्णधार म्हणून नेतृत्व करणे चांगले आहे. आमच्यातील कोणालाही हे वाटलं नव्हतं की असं काही होईल.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर