टीम इंडियामध्ये निवड न झाल्याच्या बातम्यांदरम्यान MS धोनीनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर टीम इंडियाची (भारतीय क्रिकेट संघ) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी -२० मालिका भारतातच होणार आहे. या मालिकेसाठी संघनिवड ४ सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र, या मालिकेसाठी एम.एस. धोनीची निवड होणार नसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या दरम्यान आता धोनीने एक मोठा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे. ताज्या मीडिया रिपोर्टनुसार धोनीने स्वत:च दक्षिण आफ्रिका मालिकेत खेळणार नसल्याचे सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिका मालिकेत धोनी खेळणार नाही :
काही वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार धोनीने दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे. धोनीच्या जवळच्या सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. दरम्यान, बुधवारी पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेविरोधात टी-२० मालिकेसाठी वेस्ट इंडिज दौर्‍यावरील टी-२० मालिका खेळणार्‍या संघाचीच निवड करणार आहेत. त्यानुसार ऋषभ पंत विकेटकीपरची भूमिका निभावेल.

मालिकेत धोनीची निवड का नाही ? :
२०२० मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषक मालिकेमध्ये धोनीला संधी न मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सध्याचे निर्णय होत आहेत. पीटीआयच्या म्हणण्यानुसार बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की टी-२० विश्वचषक होण्यापूर्वी भारताला २२ टी-२० सामने खेळायचे आहेत आणि निवडकर्त्यांनी आता भविष्याचा विचार करून संघ निवडण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत दक्षिण अफ्रिका टी-२० मालिकेत ऋषभ पंत विकेटकीपिंग करताना दिसणार असून धोनीला संधी मिळणार नाही अशी माहिती आहे. मात्र, आता स्वत: धोनीने या टी २० मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, धोनीने वेस्ट इंडिज दौर्‍यामधून देखील सुट्टी घेतली होती. या काळात धोनीने भारतीय सैन्याबरोबर प्रशिक्षण घेतले. तो दक्षिण काश्मीरमधील सैन्याच्या छावणीत १५ दिवस होता. यादरम्यान १५ ऑगस्ट रोजी त्याला लडाख येथे जाऊन तिरंगा फडकावण्याचा मान मिळाला.

आरोग्यविषयक वृत्त –