धोनीच्या शहरात रोहितची ‘धमाल’ ! ‘सिक्सर’ खेचून बनवलं पहिलं व्दिशतक, डॉन ब्रॅडमन पेक्षाही मोठा फलंदाज बनला ‘हिटमॅन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने रांची येथे सुरु असलेल्या कसोटीमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले आहे. या आधी कसोटीतील रोहित शर्माची 177 ही सर्वश्रेष्ठ धावसंख्या होती. तसेच पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने दोन शतके ठोकली होती. या कसोटीमध्ये रोहितने अजिंक्य रहाणे सोबत भागीदारी करत धावसंख्येत मोठी भर टाकली आहे.

रोहित शर्मा कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतक ठोकणारा चौथा खेळाडू आहे. रोहितच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि क्रिस गेलच्या नावे होता. त्याचप्रमाणे रोहित शर्मा हा भारतीय संघातील पहिला खेळवू आहे ज्याने कसोटीला आपले द्विशतक षटकार मारून केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी मालिकेत रोहित शर्माने 500 पेक्षा अधिक धावा बनवल्या आहेत. चौदा वर्षानंतर एखाद्या भारतीय ओपनरने अशी कामगिरी करून दाखवली आहे. या आधी हा कमाल पाकिस्तान विरोधात खेळताना वीरेंद्र सेहवागने करून दाखवला होता.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दोन वेळा 150 हुन अधिक धावा बनविणारा पहिला ओपनर फलंदाज हा रोहित शर्मा ठरला आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात 267 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. दरम्यान, हिटमॅन रोहित शर्मानं अनेक विक्रम मोडित काढले असून त्यानं क्रिकेट विश्वातील सर्वात महान डॉन ब्रॅडमनच्या देखील विक्रमांची बरोबरी केली आहे. त्यामुळेच हिटमॅन आता डॉन ब्रॅडमन पेक्षाही महान फलंदाज बनला आहे.

 

visit : Policenama.com