विराट कोहलीनं साऊथ आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूला मारलं, ICC ने दिली ‘ही’ शिक्षा (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंगळुरु टी-२० मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला क्रिकेट आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केल्याबद्दल आयसीसीने दोषी ठरवले आहे. आयसीसीनेही यासाठी विराट कोहलीला इशारा दिला आहे. याचे कारण म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या भारतीय डावाच्या वेळी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ब्युरन हेन्ड्रिक्सला खांदा मारून धडक दिली होती.

मॅच रेफरीने विराटला ठरवले :
दरम्यान, भारतीय डावाच्या पाचव्या षटकात विराट कोहलीने एक धाव घेतली आणि ब्युरन हेन्ड्रिक्सला जोरात धडक दिली.हेन्ड्रिक्स आपले दुसरी षटक टाकत असताना त्याच्या चेंडूवर विराट कोहली एक घेण्यास धावला तेव्हा हेंड्रिक्स भारतीय कर्णधार कोहलीकडे पहात होता. त्यानंतर विराट कोहलीने अचानक हेन्ड्रिक्सला त्याच्या खांद्यावर धडक दिली. यानंतर मॅच रेफरीने या प्रकरणाची दखल घेतली आणि विराट कोहलीला दोषी ठरवले.

पुन्हा चूक झाल्यास विराटवर होऊ शकेल कारवाई :
आयसीसीच्या म्हणण्यानुसार विराट कोहलीच्या खात्यात ‘डिमेरिट’ चा पॉईंट जोडला गेला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये सुधारित आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोहलीचा हा तिसरा गुन्हा आहे. १५ जानेवारी २०१८ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्रीटोरिया कसोटी दरम्यान आणि २२ जून २०१९ रोजी अफगाणिस्तानविरुद्धच्या वर्ल्ड कप सामन्यादरम्यान त्याला एक- एक ‘डिमेरिट’ पॉईंट मिळाला होता.

कोहलीला आणखी एक डिमेरिट पॉईंट मिळाल्यास त्याला एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामने किंवा दोन टी -२० सामन्यांच्या बंदीचा सामना करावा लागू शकतो. आयसीसीच्या नियमांनुसार, जर खेळाडूला २४ महिन्यात चार किंवा त्यापेक्षा जास्त डिमरेट गुण मिळाले तर ते निलंबनाची कारवाई केली जाऊ शकते.

सामन्यात विराट झाला फ्लॉप :
तिसर्‍या टी -२० मध्ये विराट कोहलीने आपली आक्रमक वृत्ती दर्शविली पण तो फलंदाजीमध्ये मात्र फ्लॉप झाला. विराट कोहली अवघ्या ९ धावांवर बाद झाला. त्याची विकेट कागिसो रबाडाने घेतली. त्याचवेळी विराट कोहलीने धडक दिलेल्या गोलंदाजाला मात्र सामनावीर म्हणून निवडले गेले. ब्युरन हेन्ड्रिक्सने त्याच्या ४ षटकांत केवळ १४ धावा देऊन २ गडी बाद केले.

Visit : policenama.com