‘A गणपत चल दारू ला’ ! ‘त्या’ एका ट्विटवरून नेटकऱ्यांनी रवी शास्त्रीला ‘धुतलं’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाने नुकताच विंडीज दौऱ्यावर तीनही प्रकारात शानदार विजय मिळवत आपल्या नवीन मोसमाला सुरुवात केली आहे. या विजयानंतर भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

ravi shastri team india india vs west indies

रवी शास्त्री यांनी केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या हातात बिअरचा ग्लास आहे. मात्र यावरून त्यांना नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही जणांनी त्यांना दारुडे म्हटले आहे तर काही जणांनी असे प्रशिक्षक सर्वांना हवे असे म्हटले आहे. तर एका चाहत्याने ‘ए गणपत चल दारू ला’ असे म्हणत शास्त्री यांची खिल्ली उडवली आहे.

ravi shastri, tema india रव‌ि शास्‍त्री
ravi shastri, tema india रव‌ि शास्‍त्री

दरम्यान, रवी शास्त्री यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा निवड करण्यात आली असून निवड समिती लवकरच सपोर्ट स्टाफची देखील निवड करणार आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला नवीन सपोर्ट स्टाफ मिळणार कि नाही हे पाहणे महत्वाचे आहे.

ravi shastri, tema india रव‌ि शास्‍त्री
ravi shastri, virat kohli, रवि शास्‍त्री

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like