‘ऋषभ पंत’नं फक्त 11 मॅचमध्ये मोडला ‘धोनी’चा ‘हा’ रेकॉर्ड !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर असताना भारतीय बॅट्समन ऋषभ पंत वर सध्या अनेक जण टीका करत आहे. असे म्हणले जात आहे की, पंत आपल्या विकेटची किंमत समजत नाही आणि मैदानावर सेट झाल्यानंतर खराब शॉट खेळून आऊट होतो. परंतू भारतीय संघाने या टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. पंतने अजूनही अशी कोणतीही चांगली खेळी केलेली नाही.

भारतीय क्रिकेट संघाने जमैका टेस्ट च्या तिसऱ्या दिवशी पहिल्या डावाच 299 धावा काढल्या. त्यांनी दुसऱ्यांना फलंदाजी करताना भारताने 468 धावा केल्या. वेस्टइंडिजचा दुसरा डाव मात्र चांगला झाला नाही आणि तिसऱ्या दिवशी खेळ समाप्त होईपर्यंत वेस्टइंडिजची 2 बाद 45 धावा होत्या. वेस्टइंडिजची पहिली विकेट बॅथवेट हा होता, जेव्हा इशांत शर्माने ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला आणि ड्राइव लावण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटच्या किनाऱ्याला लागला आणि तो झेल विकेटकिपर असलेल्या ऋषभ पंत ने घेतला.

11 टेस्टमध्ये 50 विकेट –
या विकेटनंतर ऋषभ पंतने भारताचा माजी विकेट किपर महेंद्र सिंह धोनी याला मागे सोडले. यानंतर पंत भारताच्या टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने विकेट घेणारा विकेटकिपर बनला. पंतने 11 टेस्टमध्ये 50 विकेट घेतल्या. तर धोनीने 15 टेस्टमध्ये 50 विकेट घेतल्या होत्या. असे असले तरी या सीरीजमध्ये त्याने इतर कोणतीही मोलाची कामगिरी केली नाही. दोन टेस्ट मॅचमध्ये त्यांने फक्त 58 धावा केल्या. त्यातील त्याचा सर्वात जास्त स्कोर 27 धावांचा होता.

इशांत शर्माने कपिल देवला सोडले मागे –
याच टेस्टमध्ये गोलंदाज इशांत शर्माने इतिहास रचला. त्यांना कपिल देवला देखील मागे टाकले. इशांत शर्मा आता अशियाच्या बाहेर सर्वात जास्त विकेट घेणारा भारतीय पेसर बनला आहे. त्याने आता पर्यंत 156 विकेट घेतल्या तर कपिल देव यांनी अशिया बाहेर 155 विकेट घेतल्या होत्या.

आरोग्यविषयक वृत्त –