वेस्ट इंडीज दोर्‍यापुर्वी मुंबईकर रोहितचं ‘जबरदस्त’ ट्विट ; म्हणाला, ‘मी फक्‍त संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये ३ ऑगस्टपासून मालिकेला सुरूवात होणार आहे. टी-२० व सामन्यांच्या मालिकेपासून भारताची या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला असून या दौऱ्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा माध्यमांत झळकत होत्या. मात्र या सगळ्यात विराट कोहलीने दौऱ्यावर रवाना होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता रोहित शर्मा याचे देखील एक वक्तव्य समोर आले आहे. त्याच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद असल्याचे दिसून येत आहे.

रोहित शर्माने या सगळ्याबाबत शेवटी मौन सोडले आहे. माध्यमांत सुरु असलेल्या चर्चानंतर आता रोहित शर्मा याने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्याने म्हटले आहे कि, मी फक्त संघासाठी नाही तर देशासाठी मैदानात उतरतो. रोहित शर्माने वादाच्या पार्श्वभूमीवर हि पोस्ट केल्याने या पोस्टला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर विराट कोहलीशी असलेल्या वादामुळेच तर त्याने हि पोस्ट केली नाही ना याची देखील चर्चा होत आहे.

..तर धावा झाल्या नसत्या

दोघांमधील वादाविषयी कर्णधार कोहली याने पत्रकार परिषदेत उत्तर देताना म्हटले होते कि, आमच्या दोघांमध्ये कोणतेही वाद नसून जर दोघांमध्ये वाद असते तर वर्ल्डकपमध्ये दोघांचेही प्रदर्शन खराब झाले असते त्याचबरोबर दोघांच्याही धावा झाल्या नसत्या. त्याचबरोबर आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नसून या वादाचा आरोप कोहलीने अनेकवेळा फेटाळला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –