विराट कोहलीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर आता कर्णधारपदावर टांगती तलवार असताना विराट कोहलीने एक निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात असून या दौऱ्यावर तो जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पुढील महिन्यात भारत विंडीज दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात तो सहभागी होणार नसल्याची माहिती मिळत होती. विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दोघे या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे कळत होते. मात्र कर्णधारपद जाण्याची टांगती तलवार असल्याने त्याने या दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार, तो विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.

कर्णधारपदावर तलवार

सुरुवातीला विराट कोहली या दौऱ्यातून विश्रांती घेणार असल्याचे समजत होते. मात्र आता तो या दौऱ्यावर जाण्यासाठी का तयार झाला हा प्रश्न क्रीडा रसिकांना पडला आहे. बीसीसीआय लवकरच विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढून रोहित शर्मा याची निवड करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आपले कर्णधारपद जाण्याच्या भीतीने त्याने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विराट कोहली सध्या कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही.

भारताचा वेस्टइंडीज दौरा

भारताच्या या दौऱ्याला ३ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामने, ३ टी -२० सामने आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड १९ जुलै रोजी होणार असून या दौऱ्यात नवीन खेळाडूंना संधी देण्याचा विचार निवड समिती करत आहे. महेंद्रसिंग धोनी देखील या दौऱ्यावर जाणार नसून सलामी फलंदाज शिखर धवन हा देखील जखमी असल्याने खेळण्याची शक्यता कमी आहे.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like