चेन्नईमध्ये वेस्टइंडीजनं टीम इंडियाला ‘धो-धो’ धुतलं, ‘या’ 5 चुकांमुळे झाला ‘विराट’ सेनेचा पराभव

चेन्नई : वृत्तसंस्था – वेस्ट-इंडिज विरुद्धच्या तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेची सुरुवात भारतीय संघाने पराभवाने केली आहे. चेन्नई या ठिकाणी पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ ८ विकेट्सनी पराभूत झाला. कॅप्टन कोहलीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २८७ धावा केल्या, प्रत्युत्तरालादाखल वेस्ट-इंडिजच्या संघाने फक्त २ विकेटच्या बदल्यात आणि १३ चेंडू राखून विजय मिळवला.
शुमरॉन हेटमायर आणि शे होप हे इंडिजच्या विजयाचे शिल्पकार ठरले. हेटमायरने १३९ तर, शे होपने नाबाद १०२ धावा बनवल्या.

भारतीय संघाच्या पराभवाची प्रमुख पाच कारणे
१- संघनिवडीतली चूक-
भारतीय संघाने चेन्नई वन-डे सामन्यासाठी योग्य संघाची निवड केली नाही. फक्त चारच गोलंदाजांसहित भारतीय संघ सामन्यात उतरला. शिवम दुबे आणि केदार जाधव वर विश्वास ठेवणं संघाला महागात पडलं. केदार जाधव ने एका ओव्हर मध्ये ११ धाव दिल्या. तर, शिवम दुबे ने ७.५ ओव्हर मध्ये ६८ धाव दिल्या, दोघे विकेट घेण्यात मात्र अपयशी ठरले.
२- विराट कोहली आणि के.एल राहुल एकाच ओव्हर मध्ये बाद-
दोन्ही फलंदाज संघासाठी अत्यंत महत्वाचे; मात्र दोघे एकाच ओव्हर मध्ये बाद झाल्याने संघाला नुकसान झेलावे लागले.
३-अय्यर आणि ऋषभ पंतचे अपयश-
रोहित आणि कोहली बाद झाल्यानंतर पंत आणि अय्यर कडून संघाला आशा होती. मात्र, दोघेही खेळपट्टीवर जास्त काळ टिकू शकले नाहीत. अय्यर ने ७० तर पंतने ७१ धावा बनवल्या. मात्र , पुढे जास्त काळ ते खेळू शकले नाहीत.
४- सुटलेले झेल-
श्रेयस अय्यर आणि विराट कोहली याने हेटमायरचे सोडलेले झेल पराभवाला तेवढेच कारणीभूत आहेत. त्यामुळे येत्या काळात क्षेत्र रक्षणावर संघाला काम करावे लागेल.
५- चुकीची गोलंदाजी –
भारतीय संघाचे गोलंदाज भरकटल्यासारखी गोलंदाजी करत होते. हेटमायर विरुद्ध प्रभावी मारा करण्यात गोलंदाज कमी पडले. त्यामुळेच हेटमायरने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/