दिपक चाहरनं 13 ‘बॉल’मध्ये घेतले 10 ‘विकेट’, क्रिकेट जगात प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – एक असा गोलंदाज ज्याला चेंडूचा बादशाहच म्हणलं पाहिजे. जेव्हा कधी कर्णधार चिंतेत असतो त्यावेळी चेंडूचे एक शस्त्र म्हणूनच हा खेळाडू गोलंदाजी करतो. गोलंदाजीची प्रॉक्टिस करु हा खेळाडू गोलंदाजी करण्यात एकदम कौशल्यपूर्ण झाला आहे, काही जण त्याला धोनीचा हकूमी एक्का म्हणतात. तो त्याच्या या यशाचे श्रेय आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्सबरोबर घालवलेल्या त्या क्षणांना देतो. छोट्याशा करिअरपासून क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचणारा हा भारतीय क्रिकेटमधील खेळाडूची घराघरात ओळख निर्माण झाली आहे. हा खेळाडू आहे दीपक चहर.

दीपक चहरने 5 दिवसांपूर्वी असा काही कारनामा केला जो कदाचितच कोणी करु शकला असेल. या गोलंदाजाने तीन वेगवेगळ्या सामन्यादरम्यान फक्त 13 चेंडूत 10 विकेट घेत मोठा इतिहास रचला. आता त्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील नावाजले आहे. ही अनोखा रेकॉर्ड बांग्लादेश विरोधात नागपूर टी – 20 सामन्यात त्याने केला आहे. या सामन्यात दिपकने आपल्या शेवटच्या तीन चेंडूत 3 विकेट घेतल्या. त्यानंतर दोन दिवसांना चहर राजस्थानमध्ये सैयद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्यास उतरला आणि विदर्भाच्या विरोधात 6 चेंडूत 4 विकेट घेतले. त्यावर शांत न बसणाऱ्या चाहरने यूपी विरोधातातील सामन्यात 4 चेंडूंत 3 विकेट घेतल्या. त्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.

बांग्लादेश विरोधात 3 चेंडूत घेतले 3 विकेट –
नागपूरमध्ये टी 20 सामन्यात दीपक चहरने एक ऐतिहासिक प्रदर्शन केले. त्याने 3.2 ओवरमध्ये फक्त 7 धावा देत 6 विकेट घेतले. एवढेच नाही तर खरी कमाल तर आपल्या तिसऱ्या आणि बांग्लादेशच्या 18 व्या ओवरमध्ये केली, शेवटच्या चेंडूत त्यांना बांग्लादेशच्या शफीउल इस्लामला बाद केले. ज्यावेळी चाहर 20 वी ओवर टाकत होता तेव्हा त्याची 4 थी ओवर सुरु होती. या ओवरच्या सुरुवातीच्या दोन चेंडूत चाहरने मुस्ताफिजर रहमान आणि अमीनुल इस्लाम यांना तंबूत पाठवले आणि आपली हॅट्रिक पूर्ण केली. त्याबरोबर त्याचा खात्यात तीन चेंडूत तीन विकेट जमा झाले.

सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीमध्ये 6 चेंडूत घेतले 4 विकेट –
बांग्लादेशच्या विरोधात खेळल्यानंतर चाहरने सैयद मुश्ताफ अली ट्रॉफीच्या सामन्यात राजस्थानकडून खेळताना विदर्भाचे 6 चेडूंत 4 खेळाडू तंबूत पाठवले. यात चहरने पहिल्याच चेंडूत रुषभ राठौडला तंबूत धाडले. यानंतर दिपक चाहरने चौथ्या चेंडूत दर्शन नालकंडे तर 5 व्या चेंडूत श्रीकांत आणि ओवरच्या शेवटच्या चेंडूत अक्षय वाडकर याला बाद केले. त्यानंतर राजस्थानकडून खेळताना यूपीच्या विरोधात दीपक चाहरने आपल्या शेवटच्या ओवरमध्ये 4 चेंडूत तीन खेळाडू बाद करत यूपीच्या संघाला मोठा धक्का दिला. यात त्याने मोहसिन खानला पहिल्या चेंडूत बाद केले त्यानंतर तिसऱ्या चेंडूत शानू सैनी आणि चौथ्या चेंडूत शुभम चौबे याला बाद केले.

चाहरचे करिअर प्रोफाइल –
27 वर्षाच्या दिपक चाहरने भारतीय क्रिकेट संघाबरोबर एक वनडे आणि 7 टी – 20 सामने खेळले आहेत. वन डे मध्ये त्याने 1 विकेट मिळवली आहे तर 7 टी – 20 मध्ये 14 विकेट मिळवल्या आहेत. एवढेच नाही तर दिपकने 45 श्रेणीच्या सामन्यात 126 तर 44 लिस्ट ए सामन्यात 57 विकेट मिळवल्या आहेत.याशिवाय 67 टी – 20 घरेलू सामन्यात 87 विकेट घेतल्या आहेत.

रणजीत केले होते पदार्पण – 10 धावा देत घेतल्या 8 विकेट –
दिपक चहरने 18 व्या वर्षी रणजीमध्ये पदार्पण केले. त्यात 10 धावा देत 8 विकेट घेतल्या. त्याच्या स्विंग चेंडूवर त्याने हैदराबादचा संघ फक्त 21 धावात तंबूत पाठवला. विशेष म्हणजे त्याच्या क्रिकेटच्या व्हिडिओला यूट्यूबला भरपूर व्हिव आहे.

एक लाख चेंडूंचे गणित –
दिपक चहरचे वडील लोकेंद्रसिंह चहर म्हणाले की नागपूर टी – 20 प्रदर्शनाआधी दिपकने नेट प्रॉक्टिस करत एक लाख चेंडू खेळले आहेत. आता वाटते की दोघांनी जे स्वप्न पाहिले होते ते तो साकार करेल.

धोनी है तो मुमकिन है –
दिपक चहर आपल्या यशाचे श्रेय महेंद्र सिंह धोनीला द्याचे विसरला नाही. आयपीएलमध्ये धोनीने दिपक चाहरचा चांगला वापर करुन घेतला. धोनीने सुरुवातीच्या सामन्यात त्यांच्याकडून 4 ओवर खेळून घेतले होते. त्यानंतर धोनीने टूर्नामेंटमध्ये डेथ ओवर्समध्ये देखील त्याच्याकडून बॉलिंग करुन घेतली. सुरुवातील काही चूका झाल्या परंतू धोनीच्या ओरडण्याने आणि मार्गदर्शनामुळे चहर मार्गावर आला. त्याच्या बॉलिंगच्या लाइनमध्ये देखील चांगला सुधार आला.

Visit : Policenama.com