वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरासोबत ‘ती’ तरुणी कोण ? ; चाहत्यांना पडला ‘यक्ष’ प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला ८९ धावांनी धूळ चरत आपला या स्पर्धेतील दबदबा कायम ठेवला आहे. गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर असून भारतीय संघाने आतापर्यंत फक्त ४ सामने खेळले असून भारताचे अजून पाच सामने बाकी आहेत.

या सगळ्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा याने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केल्याने त्याच्या अफेयरच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पाठमोरा दिसत असलेल्या या फोटोत बुमराहचे नाव ज्या दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं होतं ती आहे का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात २२ जूनला सामना होणार आहे. मात्र सामन्याआधी त्याने टाकलेल्या फोटोमुळे चर्चा रंगू लागली आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 22 जूनला सामना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या अफेअरच्या चर्चेनं धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता त्याने अपलोड केलेल्या या फोटोनं त्या चर्चेला पुन्हा सुरुवात केली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा हिच्याबरोबर बुमराचे नाव जोडले जात आहे. त्यामुळे त्यांच्या अफेयर असल्याच्या चर्चा रंगात आहेत. अनुपमा आणि बुमरा दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. यामुळे चाहत्यांनी त्या दोघांचे अफेयर असल्याचा समाज करून घेतला आहे. मात्र याबाबतीत अभिनेत्री अनुपमाने असं काही नसल्याचा खुलासा यापूर्वी केला आहे. तरीही चाहते मात्र त्या दोघांचे अफेयर नसल्याचे मानायला तयार दिसत नाहीत.

दरम्यान, बुमराने टाकलेल्या या फोटोत त्यानं म्हटलं आहे की, माझ्या सुख दु:खात मला नेहमी आधार देणारी व्यक्ती. त्यामुळे चाहत्यांना ती व्यक्ती अनुपमाच आहे असे वाटले असल्याने काही चाहत्यांनी ती अनुपमा आहे का असा प्रश्न देखील जसप्रीत बुमरा याला विचारला आहे. यापूर्वी देखील बुमरा याचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री राशी खन्नाशी जोडले गेले होते. त्यावेळी राशीनेसुद्धा असे काही नसल्याचे स्पष्ट केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय 

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय

 

You might also like